Harshavardhan Kapoor now a shooter! | ​हर्षवर्धन कपूर आता बनणार शूटर!

राकेश ओम प्रकाश मेहरा यांच्या ‘मिर्ज्या’ या बॉलिवूडपटातून बॉलिवूड डेब्य करणारा हर्षवर्धन कपूर सध्या काय करतोय? तर तो ‘भावेश जोशी’ या चित्रपटाच्या शूटींगमध्ये व्यस्त आहे. यानंतर हर्षवर्धन काय करणार आहे? तर तो शूटर बनणार आहे. ( हर्षवर्धनची अभिनेत्याची हौस फिटली की काय? असा प्रश्न तुम्हाला पडला असेल, पण असे नाही. हर्षवर्धन अभिनेता म्हणूनच काम करत राहणार आहे.) होय, आॅलिम्पिक स्पर्धेत सुवर्ण पदक पटकावणारा शूटर अभिनव बिंद्रा याच्या आयुष्यावर बायोपिक बनवण्याची तयारी सध्या सुरु आहे आणि यात हर्षवर्धन लीड रोलमध्ये असल्याची खबर आहे. विशेष म्हणजे, या चित्रपटात हर्षच्या वडिलांची भूमिका हर्षचे रिअल लाईफ फादर अर्थात अनिल कपूर हे साकारणार आहेत. कन्नन अय्यर दिग्दशर््ित या चित्रपटाचे नाव अद्याप ठरलेले नाही. पण यासाठी एका मोठ्या स्टुडिओने आणि एका नामी प्रोड्यूसरने हातमिळवणी केल्याची खबर आहे. प्री-प्रॉडक्शनचे काम सुरु झाले असून याच वर्षात या चित्रपटाचे शूटींग सुरु होणार असल्याचे कळतेय.

ALSO READ : हर्षवर्धन कपूरचे सेटवर ‘नखरे’ सुरू

 हर्षवर्धनचे ‘मिर्ज्या’तून ग्रँड लॉन्चिंग केले होते. पण हा चित्रपट बॉक्सआॅफिसवर दणकून आपटला होता. आता हर्षवर्धनला ‘भावेश जोशी’कडून बºयाच अपेक्षा आहेत. आता त्याच्या या अपेक्षा किती पूर्ण होतात, ते लवकरच दिसेलच. सगळ्यात आधी इमरान खान याचा ‘भावेश जोशी’ची आॅफर दिली गेली होती. चित्रपटाची तयारीही सुरु झाली होती. मात्र नंतर इमरानची पत्नी अवंतिका प्रेग्नेंट राहिली आणि त्यामुळे इमरानने हा चित्रपट सोडला. यानंतर विक्रमादित्य यांनी सिद्धार्थ मल्होत्रा याला फायनल केले. मात्र सिद्धार्थनेही विक्रमादित्य यांना ‘खो’ दिला. मग चित्रपट रखडला तो रखडलाच. पण  हर्षवर्धनने अखेर हा चित्रपट मार्गी लावलाच...

Web Title: Harshavardhan Kapoor now a shooter!
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.