Harmanpreet's role to play Deepika Padukone? | दीपिका पादुकोण साकारणार का हरमनप्रीतची भूमिका ?

सध्या खेळाडूंच्या आयुष्यावर आधारित चित्रपट येण्याचा बॉलिवूडमध्ये ट्रेंड सुरु आहे. मिल्खा सिंग, मेरीकॉम, एमएस धोनी आणि सचिन तेंडुलकर यांचे बायोपिक आतपर्यंत येऊन गेले आहेत. या चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई देखील केली. बॅडमिंटन पटू सायना नेहवाल आणि पी.व्ही सिंधुच्या आयुष्यावर आधारित लवकरच चित्रपट तयार करण्यात येतो आहे. आता आणखीन एक नाव सामील झाले आहे ते क्रिकेटर हरमनप्रीत कौर हिचे. सूत्रांच्या माहितीनुसार बॉलिवूडमधले काही निर्माते हरमनप्रीत कौरवर बायोपिक बनवण्याच्या तयारीत आहेत. जर हरमनप्रीत कौरवर चित्रपट तयार करण्यात आला तर रुपेरी पडद्यावर तिची भूमिका कोण साकारणार. याबाबत जेव्हा हरमनप्रीतला  प्रश्न विचारण्यात आला तेव्हा दीपिका पादुकोण आपली भूमिका पडद्यावर साकारु शकते असे तिचे म्हणणे होते. हिंदुस्तान टाइम्सला दिलेल्या मुलाखतीत तिने याबाबत उलगडा केला आहे. हरमनप्रीतने वर्ल्डकपच्या फायनलमध्ये ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या सामन्यात 171 रन्सची शानदार खेळी करत संघाला विजय मिळवून दिला होता.   

ALSO READ : दीपिका पादुकोणच्या ‘त्या’ न्यूड फोटोमागचे वास्तव तुम्हाला माहीत आहे काय?

पी.व्ही.सिंधुच्या बायोपिकमध्ये दीपिका पादुकोण झळकणार असल्याची चर्चा आहे. सध्या दीपिका संजय लीला भंसाली यांच्या पद्मावतीच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. यात ती राणी पद्मावतीची भूमिका साकारणार आहे,  रणवीर सिंग  अल्लाउद्दीन खिलजीच्या भूमिकेत तर शाहिद ‘पद्मावती’चे पती चित्तौडचे राजा रावल रत्न सिंग यांच्या भूमिकेत दिसणार आहे. हा चित्रपट नोव्हेंबरला 2017 ला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.    
Web Title: Harmanpreet's role to play Deepika Padukone?
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.