बॉलिवूडमधील सर्वांत रोमॅण्टिक जोडींपैकी एक असलेले अजय देवगण आणि काजोल आजच्याच दिवशी विवाहच्या बंधनात अडकले होते. या दोघांमध्ये जेवढी चांगली केमिस्ट्री पडद्यावर बघावयास मिळाली तेवढीच चांगलीच केमिस्ट्री त्यांच्यात रियल लाइफमध्येही आहे. त्यामुळेच या दोघांची गणना इंडस्ट्रीतील टॉप मॅरिड कपलमध्ये केली जाते. २४ फेब्रुवारी १९९९ मध्ये दोघे विवाहाच्या बंधनात अडकले होते. मराठी रितीरिवाजाने पार पडलेल्या या लग्नात इंडस्ट्रीतील अनेक सेलिब्रिटी उपस्थित होते. आज अजय आणि काजोलला युग आणि न्यासा नावाची दोन मुले आहेत. दोघांच्या स्वभावाबद्दल सांगायचे झाल्यास, अजय काहीसा शांत आणि धिरगंभीर स्वभावाचा आहे, तर काजोल चुलबुली स्वभावाची आहे. दोघांचे स्वभाव परस्परविरोधी असतानाही त्यांचे वैवाहिक जीवन सुखी समाधानाचे आहे. कदाचित याच कारणामुळे दोघे एकमेकांची कंपनी पसंत करीत असावेत. दोघांच्या वर्कफ्रंटविषयी सांगायचे झाल्यास, अजय आणि काजोलने ‘यू मी और हम’ या चित्रपटात एकत्र काम केले होते. चित्रपटात काजोल मुख्य भूमिकेत होती. आज काजोल आणि अजय त्यांच्या लग्नाचा १९ वा वाढदिवस साजरा करीत आहेत. वास्तविक बॉलिवूडमध्ये सेलिब्रिटींचे वैवाहिक जीवन दहा वर्षे मोठ्या मुश्किलने टिकते. परंतु अजय-काजोलने आतापर्यंत त्यांचे वैवाहिक जीवन टिकवून ठेवले आहे. शिवाय त्यांच्यातील प्रेम आजही कायम आहे. तुम्हाला माहिती आहे काय की, लग्नाअगोदर काजोल आणि अजयने तब्बल एक वर्ष एकमेकांना डेट केले. अजयने लग्नाअगोदर काजोलसमोर एक अट ठेवली होती. या अटीनुसार, अजयने स्पष्ट केले होते की, त्याच्या लग्नात एकही प्रोफेशनल फोटोग्राफर नको आहे. वारंवार फोटो काढणे मी अजिबातच खपवून घेणार नाही. अजयने म्हटले होते की, मी स्वत:च माझ्या लग्नात फोटोग्राफरचे काम करणार आहे. जेणेकरून मला काही आठवणींचे जतन करता येईल. 
Web Title: Happy Marriage Anniversary: ​​Ajay Devgn had put it in front of Kajol in front of the wedding!
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.