Rani Mukherjee Birthday Special: राणी मुखर्जी आणि गोविंदाबाबत या गोष्टी तुम्हाला माहीत आहेत का?

By ऑनलाइन लोकमत | Published: March 21, 2019 10:50 AM2019-03-21T10:50:37+5:302019-03-21T10:53:00+5:30

हद कर दी आपने या चित्रपटाच्या चित्रीकरणाच्या वेळी राणी मुखर्जी आणि गोविंदा यांच्यात प्रेम फुलले असल्याचे म्हटले जाते. गोविंदा आणि राणी यांच्यात अनेक वर्षांचे नाते होते

Happy birthday Rani mukherjee : Unknown facts about rani | Rani Mukherjee Birthday Special: राणी मुखर्जी आणि गोविंदाबाबत या गोष्टी तुम्हाला माहीत आहेत का?

Rani Mukherjee Birthday Special: राणी मुखर्जी आणि गोविंदाबाबत या गोष्टी तुम्हाला माहीत आहेत का?

googlenewsNext
ठळक मुद्देहद कर दी आपने या चित्रपटाच्यावेळी गोविंदाचे लग्न सुनीतासोबत झाले असून त्याला दोन मुलेदेखील होती. त्यामुळे ही गोष्ट सुनीताला कळू नये यासाठी गोविंदा अनेक प्रयत्न करत होता.

राणी मुखर्जीचा आज म्हणजेच २१ मार्चला वाढदिवस असून ती दिग्दर्शक राम मुखर्जी यांची मुलगी आहे तर अभिनेत्री काजोल ही तिची चुलत बहीण आहे. राणीने राजा की आयेगी बारात या चित्रपटाद्वारे तिच्या कारकिर्दीला सुरुवात केली. तिच्या पहिल्या चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला नसला तरी गुलाम, कुछ कुछ होता है असे एका मागोमाग एक तिने हिट चित्रपट दिले आणि बॉलिवूडमध्ये आपले प्रस्थ निर्माण केले. बॉलिवूडमधील आघाडीच्या अभिनेत्रींमध्ये आज राणीची गणना होते. 

हद कर दी आपने या चित्रपटाच्या चित्रीकरणाच्या वेळी राणी मुखर्जी आणि गोविंदा यांच्यात प्रेम फुलले असल्याचे म्हटले जाते. गोविंदा आणि राणी यांच्यात अनेक वर्षांचे नाते होते. पण गोविंदाच्या स्वभावामुळे राणी त्याच्यावर फिदा झाली आणि त्याच्याच प्रेमप्रकरण सुरू झाले असे म्हटले जाते. हद कर दी आपने या चित्रपटाचे चित्रीकरण स्विर्त्झलँड आणि अमेरिकेत सुरू असताना अनेकवेळा ते एकमेकांसोबत वेळ घालवत असत. या चित्रपटानंतर त्या दोघांच्या प्रेमप्रकरणाची चर्चा मीडियात चांगलीच रंगली होती.

हद कर दी आपनी या चित्रपटाच्या वेळी राणी ही बॉलिवूडमध्ये खूपच नवीन होती तर गोविंदाने तोपर्यंत एक यशस्वी अभिनेता म्हणून आपले नाव कमावले होते. गोविंदाच्या नावावरच चित्रपट चालत असत. त्यामुळे इंडस्ट्रीत त्याच्या नावाचा प्रचंड दबदबा होता. त्यामुळे राणीला चित्रपटात घेण्यासाठी तो निर्माते, दिग्दर्शक यांना सांगत असे. गोविंदाने राणीला अनेक चित्रपट मिळवून दिले असे म्हटले जाते.  

हद कर दी आपने या चित्रपटाच्यावेळी गोविंदाचे लग्न सुनीतासोबत झाले असून त्याला दोन मुलेदेखील होती. त्यामुळे ही गोष्ट सुनीताला कळू नये यासाठी गोविंदा अनेक प्रयत्न करत होता. गोविंदा आणि राणी कोणत्याही सार्वजनिक ठिकाणी न भेटता अनेकवेळा राणीच्या वर्सोव्याच्या फ्लॅटमध्ये भेटत असत. या फ्लॅटमध्येच त्यांना एक पत्रकाराने एकत्र पाहिले होते. 

एमटिव्ही इंडिया या वेबसाईटने दिलेल्या बातमीनुसार राणी मुखर्जीची मुलाखत घेण्यासाठी एक पत्रकार तिच्या घरी गेली होती. त्यावेळी राणीच्या रूममधून अचानक गोविंदा बाहेर आला. त्यावेळी त्याने नाइट ड्रेस घातला होता. यानंतर राणी आणि गोविंदाच्या प्रेमकथेची चांगलीच चर्चा सगळीकडे रंगली होती. पण राणीने दिलेल्या एका मुलाखतीत या सगळ्या गोष्टी चुकीच्या असल्याचे म्हटले होते. तिने म्हटले होते की, गोविंदासोबत एखाद्या अभिनेत्रीने तीन-चार चित्रपटांत काम केले की, त्या अभिनेत्रीचे नाव गोविंदासोबत जोडले जाते हे आपण अनेक वर्षांपासून पाहात आहोत. तसेच काहीसे माझ्या बाबतीत घडले आहे.

Web Title: Happy birthday Rani mukherjee : Unknown facts about rani

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.