बॉलिवूडची ‘चुलबुली’ आणि तेवढीच प्रतिभावान अभिनेत्री म्हणजे आलिया भट्ट. आज (१५ मार्च) आलियाचा वाढदिवस. आज आलिया आपला २५ वा वाढदिवस साजरा करतेय. आपल्या चाहत्यांना वाढदिवसाची भेट देत आलियाने अगदी काही क्षणांपूर्वी तिचा आगामी चित्रपट ‘राजी’चा फर्स्ट लूक जारी केलायं. शिवाय स्वत:चं स्वत:ला बर्थ डे विशही केलेयं. ‘मी केवळ ब्रेड-बटरसाठी चित्रपट करत नाही. चित्रपट मला जगण्याचे कारण देतात. माझे चित्रपट सतत मला मी जिवंत आहे, याची जाणीव करून देतात. हॅपी बर्थ डे टू मी,’ असे आलियाने लिहिले आहे.
आलिया भट्ट बॉलिवूडच्या सर्वाधिक व्यस्त अभिनेत्रींपैकी एक आहे. ‘राजी’चे शूटींग आटोपताच, आलियाने रणवीर सिंगसोबत ‘गली बॉय’चे शूटींग सुुरू केले. सोबतच ती रणबीर कपूरसोबत ‘ब्रह्मास्त्र’च्या शूटींगमध्येही बिझी आहे. आलियाने अगदी कमी वेळात स्वत:ला सिद्ध केले. इतक्या तरूण वयात इतके अफाट यश मिळवले. आज आलियाबद्दल काही खास गोष्टी आपण जाणून घेणार आहोत....आलियाचा दिवस सुरू होतो तो सूर्यनमस्कारापासून. ती फिटनेसबाबत अतिशय  सजग आहे. आपल्या पहिल्या चित्रपटासाठी आलियाने तब्बल १६ किलो वजन कमी केले होते. तेव्हापासून आजतागायत आलियाने आपला शेप बिघडू दिलेला नाही.आलियाला पक्की पार्टी गर्ल आहे. तिला पार्टी करणे, मित्रांसोबत धिंगाणा घालणे प्रचंड आवडते. आलियाला लेडीज नाही तर जेंट्स परफ्युम आवडतात. अनेकदा ती जेंट्स परफ्युम लावून बाहेर पडते. विमान प्रवास करताना ती प्रचंड घाबरते. आजही विमान प्रवासात ती कमालीची नव्हर्स होते.  आलियाचा स्वप्नातला राजकुमार कसा असेल? असा प्रश्न अनेकदा आलियाला विचारला जातो. एका मुलाखतीत तिने या प्रश्नाचे उत्तर देताना, तो पिता महेश भट्ट सारखा अजिबात नसावा, असे म्हटले होते. माझा होणारा पती माझा मित्र असावा, फन लव्हिंग असावा, असे तिने सांगितले होते.आलिया  आई सोनी राजदान आणि बहीण शाहीन भट्ट या दोघींच्या  अतिशय जवळची आहे. आलियाला घरी प्रेमाने ‘आलू’ म्हणून बोलवतात. पडद्यावर आईसोबत काम करण्याची आलियाची इच्छा आहे.१९९९ मध्ये अक्षय कुमार व प्रीती झिंटा यांच्या ‘संघर्ष’ या चित्रपटात आलिया बालकलाकार म्हणून झळकली होती. यानंतर २०१२ मध्ये ‘स्टुडंट आॅफ द ईअर’ या चित्रपटातून अभिनेत्री म्हणून तिने डेब्यू केला. या चित्रपटासाठी आलियासह ५०० मुलींनी आॅडिशन दिले होते. यातून आलियाची निवड झाली होती. पण ३ महिन्यांत १६ किलो वजन कमी कर, या अटीवर करणने तिला ही भूमिका देऊ केली होती. ALSO READ : ​‘गली बॉय’च्या सेटवरचे आलिया भट्ट व रणवीर सिंगचे फोटो लिक! पाहून तुम्हालाही बसेल धक्का !!

आपल्या सुरूवातीच्या करिअरमध्ये प्रत्येक अभिनेत्री ग्लॅमरस भूमिकेलाच पसंती देईल. पण आलिया  आपल्या दुस-याच चित्रपटात डी ग्लॅम अवतारात दिसली. हा चित्रपट होता ‘हाय वे’. रणदीप हुड्डासोबतच्या या चित्रपटातील आलियाच्या अभिनयाचे प्रचंड कौतुक झाले.

Web Title: Happy Birthday Alia Bhatt! Know, some special things of 'Chabboooli Girl' !!
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.