ठळक मुद्दे2 स्टेट्स’, ‘हम्टी शर्मा की दुल्हनियां’ पासून गत वर्षी आलेला ‘राजी’, ‘गली बॉय’ पर्यंतच्या प्रवासात आलिया एक ‘डिमांडिंग अ‍ॅक्ट्रेस’ बनली.

बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट आज (१५ मार्च) तिचा २६ वा वाढदिवस साजरा करतेय. काल रात्री या वाढदिवसाची धम्माल पार्टी रंगली. आलियाने मुंबईस्थित आपल्या घरी ही पार्टी दिली. बॉलिवूडचे अनेक सेलिब्रिटी आलियाच्या या बर्थ डे पार्टीला पोहोचले.

करण जोहरपासून अयान मुखर्जी, पूजा भट्ट अशा सगळ्यांनी या पार्टीला हजेरी लावली.

आलियाचा बॉयफ्रेन्ड रणबीर कपूर या पार्टीचे खास आकर्षण ठरला. या पार्टीत आलिया काळ्या व पांढऱ्या रंगाच्या ड्रेसमध्ये दिसली तर रणबीरने डेनिम जॅकेट व जीन्स अशा डॅशिंग अंदाजात एन्ट्री घेतली. पण आपला चेहरा कॅमेऱ्यात कैद होणार नाही, याची रणबीरने पुरेपूर काळजी घेतली. यावेळी आलियाने एकाचवेळी अनेक केक कापलेत.


गेल्या अनेक दिवसांपासून रणबीर व आलिया एकमेकांना डेट करत आहेत. लवकरच हे कपल लग्न करणार असल्याचीही खबर आहे. ‘ब्रह्मास्त्र’ या चित्रपटात आलिया व रणबीरची जोडी एकत्र दिसणार आहे.


१९९९ मध्ये अक्षय कुमार व प्रीती झिंटा स्टारर ‘संघर्ष’ या चित्रपटात आलिया बालकलाकार म्हणून झळकली. २०१२ मध्ये करण जोहरच्या ‘स्टुडंट आॅफ द ईअर’ या चित्रपटातून तिने बॉलिवूड डेब्यू केला.

यानंतर रणदीप हुड्डासोबत ‘हाईवे’ या चित्रपटात ती झळकली. या चित्रपटातील आलियाच्या अभिनयाचे प्रचंड कौतुक झाले आणि नंतर तिने कधीच मागे वळून बघितले नाही. ‘2 स्टेट्स’, ‘हम्टी शर्मा की दुल्हनियां’ पासून गत वर्षी आलेला ‘राजी’, ‘गली बॉय’ पर्यंतच्या प्रवासात आलिया एक ‘डिमांडिंग अ‍ॅक्ट्रेस’ बनली. लवकरच आलिया ‘ब्रह्मास्त्र’व ‘कलंक’ या चित्रपटात झळकणार आहे.


Web Title: Happy Birthday Alia Bhatt: alia bhatt celebrates her 26th birthday with family and friends
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.