अक्षरा हासननंतर हंसिका मोटवानीचे प्रायव्हेट फोटो लीक??

By ऑनलाइन लोकमत | Published: January 23, 2019 01:31 PM2019-01-23T13:31:45+5:302019-01-23T13:34:29+5:30

काही दिवसांपूर्वी अभिनेत्री अक्षरा हासन हिचे प्रायव्हेट फोटो लीक झाले होते. आता अभिनेत्री हंसिका मोटवानी हिचे प्रायव्हेट फोटो आॅनलाईन लीक झाल्याचे उघडकीस आले आहे.

Hansika's private photos leaked online by hackers | अक्षरा हासननंतर हंसिका मोटवानीचे प्रायव्हेट फोटो लीक??

अक्षरा हासननंतर हंसिका मोटवानीचे प्रायव्हेट फोटो लीक??

googlenewsNext
ठळक मुद्दे‘कोई मिल गया’ या चित्रपटात हंसिका बालकलाकार म्हणून दिसली होती. त्याआधी २००३ मध्ये ‘शाका लाका बूम बूम’ या टीव्ही सीरिअलमधून चाईल्ड आर्टिस्ट म्हणून हंसिकाने आपला अ‍ॅक्टिंग डेब्यू केला होता.

काही दिवसांपूर्वी अभिनेत्री अक्षरा हासन हिचे प्रायव्हेट फोटो लीक झाले होते. आता अभिनेत्री हंसिका मोटवानी हिचे प्रायव्हेट फोटो आॅनलाईन लीक झाल्याचे उघडकीस आले आहे. या फोटोंत हंसिका अंतर्वस्त्रात आहे. बहुतांश फोटो न्यूयॉर्कमधील हॉलिडे दरम्यानचे असल्याचे कळतेय. हे फोटो कसे लीक झालेत, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. हंसिकाने याबाबत कुठलीही अधिकृत तक्रार वा विधान केलेले नाही. 


तूर्तास ट्विटरने हंसिकाचे काही फोटो आपल्या साईटवरून हटवले असले तरी काही इन्स्टाग्राम पेजेसवर अद्यापही हंसिकाचे हे फोटो दिसत आहे. हंसिकाच्या पर्सनल ट्विटर व इन्स्टाग्राम अकाऊंटवरून हे फोटो शेअर झालेले नाहीत. त्यामुळे हंसिकाचे अकाऊंट हॅक झाले की, जाणीवपूर्वक तिचे प्रायव्हेट फोटो कुणी लीक केलेत, हा प्रश्न अनुत्तरीत आहे.


यापूर्वी एमी जॅक्सन व अक्षरा हासनचे प्रायव्हेट फोटो लीक झाले होते. यासंदर्भात अक्षराने पोलिसांत तक्रारही दाखल केली होती.
‘कोई मिल गया’ या चित्रपटात हंसिका बालकलाकार म्हणून दिसली होती. त्याआधी २००३ मध्ये ‘शाका लाका बूम बूम’ या टीव्ही सीरिअलमधून चाईल्ड आर्टिस्ट म्हणून हंसिकाने आपला अ‍ॅक्टिंग डेब्यू केला होता. अनेक टीव्ही शो केल्यानंतर तिला ‘कोई मिल गया’ या चित्रपटात संधी मिळाली होती. यानंतर २००७ मध्ये हिमेश रेशमियाच्या ‘आपका सुरूर’या चित्रपटात ती लीड रोलमध्ये दिसली होती.अर्थात ‘कोई मिल गया’मधली बालकलाकार अचानक इतकी मोठी झालेली पाहून त्यावेळी अनेकांना धक्का बसला होता.

हंसिकाच्या अशा अचानक मोठ्या होण्यावरून मग वेगवेगळ्या चर्चा रंगल्या होत्या. लवकर ‘वयात’ येण्यासाठी हंसिकाने हार्मोनल इंजेक्शन घेतल्याचे त्याकाळात बोलले गेले होते. ‘आपका सुरूर’ आला त्याचवर्षी हंसिकाने ‘देसमुदुरू’हा साऊथचा चित्रपट साईन केला. या चित्रपटासाठी हंसिकाला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा फिल्मफेअर पुरस्कार मिळाला आणि या पुरस्काराने हंसिकाने साऊथ इंडस्ट्रीत एक वेगळी ओळख मिळवून दिली. यानंतर हंसिकाने साऊथमध्ये एकापाठोपाठ एक असे अनेक हिट चित्रपट दिलेत. 

Web Title: Hansika's private photos leaked online by hackers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.