'Ha' will be released with Salman Khan's 'Race 3' movie | सलमान खानच्या 'रेस3'बरोबर रिलीज होणार 'हा' चित्रपट

सलमान खान आणि जॅकलिन फर्नांडिसच्या जोडीचा 'रेस3' चित्रपट ईदच्या मुहूर्तावर रिलीज होणाप आहे. 'रेस3'सोबत आयुष शर्मा स्टारर लवरात्रि चित्रपटाचा टीजर रिलीज होणार आहे.  

सलमान खानच्या बॅनर अंतर्गत तयार होणाऱ्या 'लवरात्रि' चित्रपटात आयुष शर्मा आणि वारिना हुसैन यांच्या मुख्य भूमिका आहेत. हा एक रोमाँटिक ड्रामा चित्रपट आहे ज्याचे दिग्दर्शन अभिराज मीनावाला करणार आहे. अभिनेता-अभिनेत्रीमधील प्रेमाची जुगलबंदी यात दाखविण्यात येणार आहे. या चित्रपटाची कथा नरेन भट्ट यांनी लिहिली आहे. आयुष शर्माचा ‘लवरात्री’ हा चित्रपट ५ आॅक्टोबर रोजी प्रदर्शित होणार आहे.  सुरुवातीला आयुषबरोबर अभिनेत्री मौनी रॉय झळकणार असल्याची चर्चा होती. परंतु आयुषने तिच्यासोबत काम करण्यास नकार दिल्याने तिचा पत्ता कट झाला आणि वरीनाची वर्णी लागली. या चित्रपटात वरीना एका बेले डान्सरच्या भूमिकेत दिसणार आहे.  आयुषबद्दल तसेही तुम्हाला ठाऊक आहेच.सलमानची लाडकी बहीण अर्पिता खान हिचा आयुष हा पती. गेल्या अनेक दिवसांपासून आयुष बॉलिवूड डेब्यू करणार, अशी चर्चा होती आणि आता तर आयुष डेब्यू आधीच ‘स्टार’ झालाय. 

ALSO READ :  ​‘लवरात्री’ रिलीज होण्याआधी ‘स्टार’ झाला सलमानचा मेहुणा आयुष शर्मा! विश्वास बसत नसेल तर पाहा व्हिडिओ!!

सलमानच्या रेसबाबत बोलयाचे झाले तर निर्मात्यांना असा विश्वास आहे की हा चित्रपट प्रेक्षकांच्या नक्कीच पसंतीस उतरेल. चित्रपटात सलमान आणि जॅकलीनसह अनिल कपूर, डेजी शाह, बॉबी देआल आणि साकिब सलीम यांच्या चित्रपटा भूमिका आहेत. ‘रेस’ फ्रेंचाइजीचा हा तिसरा चित्रपट असून, त्यामध्ये सस्पेन्स आणि अ‍ॅक्शनचा धमाका बघावयास मिळणार आहे. सलमान खान फिल्म्स आणि रमेश तौरानी निर्मित या चित्रपटाला टिप्स फिल्म्सच्या बॅनरअंतर्गत बनविण्यात आले आहे. चित्रपटाचे दिग्दर्शन रेमो डिसूजाने केले आहे.  
Web Title: 'Ha' will be released with Salman Khan's 'Race 3' movie
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.