'Ha' photo shared with Ranveer Singh on Instagram | रणवीर सिंग चालला व्हेकेशनवर इन्स्टाग्रामवर शेअर केला 'हा' फोटो

अभिनेत्री आलिया भट्ट आणि रणवीर सिंगने नुकतेच 'गली बॉय'चित्रपटाचे शूटिंग पूर्ण केले आहे. शूटिंग पूर्ण होताच रणवीर सिंग ब्रेक घेऊन व्हेकेशनवर गेला आहे. रणवीर सिंगने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक फोटो शेअर केला आहे. फोटो शेअर करताच रणवीरच्या फॅन्सनी त्याला कुठे चलला फिरायला असे प्रश्न विचारायला सुरुवात केली आहे. आता आम्ही तुम्हाला रणवीरचे सीक्रेट डेस्टिनेशन रिव्हील करतो.   

रणवीर आपल्या आवडत्या देशात स्वित्झर्लंडला गेला आहे. त्याचे झाले असे की स्वित्झर्लंड रणवीरच्या आवडत्या ठिकाणांपैकी एक आहे. एका इंटरव्हु दरम्यान रणवीरने सांगितले होते की, स्वित्झर्लंड हा त्याच्या मनाचा देश आहे आणि गर्मींच्या सुट्ट्यांमध्ये तो तिथे जाणार आहे. 

जोया अख्तरच्या गली बॉयमध्ये रणवीर सिंगच्या अपोझिट आलिया भट्ट दिसणार आहे. रणवीर व आलिया या चित्रपटाच्या निमित्ताने पहिल्यांदाच एकत्र काम करणार आहेत. ‘गली बॉय’मध्ये एका स्ट्रिट रॅपरची कथा असल्याचे कळतेय. जी एका रिअल लाईफ स्टोरीवर बेतलेली आहे. ही कथा गेल्या अनेक वर्षांपासून जोयाच्या डोक्यात होत्या. या चित्रपटात रणवीर व आलिया यांच्यासोबतच अभिनेत्री कल्की कोच्लिन ही सुद्धा एका महत्त्वपूर्ण भूमिकेत दिसणार आहे. चर्चा खरी मानाल तर कल्की यात एका रॅपरच्या भूमिकेत दिसेल. यापूर्वी कल्कीने जोयाच्या ‘जिंदगी न मिलेगी दोबारा’मध्ये काम केले आहे. रणवीरचे या चित्रपटातील लूक त्याच्या ‘बँड बाजा बारात’, ‘लेडिज वर्सेस रिकी बहल’ या चित्रपटातील लूकशी बरेच मिळते जुळते आहेत. 14 फेब्रुवारी 2019 ला हा चित्रपट रिलीज होणार आहे. 

ALSO READ :  रणवीर सिंग आणि सारा अली खानच्या सिम्बा चित्रपटात केला जाणार हा मोठा बदल..जाणून घ्या 'या' मागचे कारण

गली बॉयनंतर रणवीर रोहित शेट्टीच्या ‘सिम्बा’मध्ये सुद्धा दिसणार आहे. ‘सिम्बा’मध्ये रणवीर सिंग संग्राम भालेराव या पोलिस अधिकाºयाची भूमिका साकारताना दिसणार आहे. हा सिनेमा तेलगू चित्रपट ‘टेंपर’चा रिमेक आहे. 
Web Title: 'Ha' photo shared with Ranveer Singh on Instagram
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.