gully boy star alia bhatt reveled she forgets her dialogues due to ranbir kapoor | रणबीर कपूरसोबत काम करताना आलिया भट्टला पडतो जगाचा विसर...!!
रणबीर कपूरसोबत काम करताना आलिया भट्टला पडतो जगाचा विसर...!!

ठळक मुद्देआलिया रणबीरचं नाही तर रणबीरच्या कुटुंबातही गुंतलीय, हे स्पष्ट आहे. रणबीर आला की, आलिया सगळे काही विसरते, यातचं सगळे काही आले.

बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्ट सध्या ‘गली बॉय’ या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये बिझी आहे. याशिवाय आणखी एका गोष्टीत आलिया गुंतली आहे. ती म्हणजे रणबीर कपूरचे प्रेम. होय, रणबीरच्या प्रेमात आलिया आकंठ बुडालीय आणि म्हणूनचं त्याच्याबद्दल बोलताना थकत नाहीये. काही दिवसांपूर्वी आलिया व रणबीरमध्ये सगळे काही ‘आॅल वेल’ नसल्याची चर्चा होती. पण आलिया अलीकडे रणबीरबद्दल जे काही बोलली, त्यावरून या चर्चेत काहीही अर्थ नाही, हे तुम्हालाही पटेल. आलिया व रणबीर लवकरच ‘ब्रह्मास्त्र’ या चित्रपटात एकत्र दिसणार आहेत. या सेटवरची रणबीरसोबतची केमिस्ट्री कशी होती, यावर आलिया अलीकडे भरभरून बोलली. 


‘मी माझ्या आयुष्यात रणबीर कपूर इतका चांगला अभिनेता पाहिला नाही. त्याच्यासोबत काम केल्यानंतर तो किती उत्तम कलाकार आहे, हे मला कळले.   जेव्हा केव्हा मी त्याला अभिनय करताना पाहायचे,  नुसते पाहतचं राहायचे. त्याच्यासोबत परफॉर्म करताना मी अनेकदा माझे संवाद विसरायचे. तो समोर आला की, सगळे काही विसरायला होते,’ असे आलिया म्हणाली.


आलिया केवळ रणबीरबद्दलचं बोलली नाही तर रणबीरचे मॉम डॅड अर्थात नीतू कपूर व ऋषी कपूर यांच्याबद्दलही बोलली. नीतूजी एक खूप चांगले व्यक्तिमत्त्व आहे. मला वाटते, त्यांच्यामुळेच रणबीर इतका मनमौजी झालाय. ऋषी कपूर सगळ्यांपेक्षा वेगळे आहेत. त्यांच्यासोबत असताना मला मज्जा येते, असे तिने सांगितले.
एकंदर काय तर आलिया रणबीरचं नाही तर रणबीरच्या कुटुंबातही गुंतलीय, हे स्पष्ट आहे. रणबीर आला की, आलिया सगळे काही विसरते, यातचं सगळे काही आले.


Web Title: gully boy star alia bhatt reveled she forgets her dialogues due to ranbir kapoor
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.