Box Office Collection:  पहिल्याच दिवशी ‘गली बॉय’ची बम्पर कमाई!

By ऑनलाइन लोकमत | Published: February 15, 2019 02:31 PM2019-02-15T14:31:47+5:302019-02-15T14:32:23+5:30

रणवीर सिंग आणि आलिया भट्ट यांच्या ‘गली बॉय’ या चित्रपटाने  बॉक्स ऑफिसवर धूम केलीय. प्रदर्शनाच्या पहिल्याच दिवशी या चित्रपटाने  धमाकेदार ओपनिंग करत एका विक्रमावर नाव कोरले.

Gully Boy box office collection on first day | Box Office Collection:  पहिल्याच दिवशी ‘गली बॉय’ची बम्पर कमाई!

Box Office Collection:  पहिल्याच दिवशी ‘गली बॉय’ची बम्पर कमाई!

googlenewsNext
ठळक मुद्दे आलियाच्या फिल्मी करिअरमध्ये ‘गली बॉय’ सर्वात मोठा ओपनर ठरला आहे. म्हणजेच ‘गली बॉय’ पहिल्या दिवशी सर्वाधिक कमाई करणारा आलियाचा पहिला चित्रपट ठरला आहे.

रणवीर सिंग आणि आलिया भट्ट यांच्या ‘गली बॉय’ या चित्रपटाने  बॉक्स ऑफिसवर धूम केलीय. प्रदर्शनाच्या पहिल्याच दिवशी या चित्रपटाने  धमाकेदार ओपनिंग करत एका विक्रमावर नाव कोरले. होय, ‘गली बॉय’ हा रणवीरचा तिसरा आणि आलियाचा पहिला सर्वात मोठा ओपनर ठरला.  
ट्रेड एक्स्पर्ट तरण आदर्श यांनी दिलेल्या आकडेवारीनुसार, ‘गली बॉय’ ने पहिल्या दिवशी १८.७० कोटी रूपयांचा गल्ला जमवला.  तब्बल ३३५० स्क्रिन्सवर झळकलेला ‘गली बॉय’  शुक्रवारी प्रदर्शित न करता ‘व्हॅलेन्टाईन डे’ला प्रदर्शित करण्यात आला आणि या चित्रपटाला प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद मिळाला.




यापूर्वी रणवीरच्या ‘पद्मावत’ या चित्रपटाने पहिल्या दिवशी २४ कोटींची कमाई केली होती. यानंतर अलीकडे प्रदर्शित झालेला ‘सिम्बा’ रणवीरच्या करिअरमधील सर्वात मोठा दुसरा ओपनर सिनेमा होता. या चित्रपटाने पहिल्या दिवशी २०.७२ कोटीची कमाई केली होती.आता रणवीरच्या ‘गली बॉय’ने पहिल्या दिवशी १८.७० कोटी रूपयांचा बिझनेस केला आहे.
विशेष म्हणजे, आलियाच्या फिल्मी करिअरमध्ये ‘गली बॉय’ सर्वात मोठा ओपनर ठरला आहे. म्हणजेच ‘गली बॉय’ पहिल्या दिवशी सर्वाधिक कमाई करणारा आलियाचा पहिला चित्रपट ठरला आहे. या पाठोपाठ तिच्या ‘शानदार’ आणि ‘बद्रीनाथ की दुल्हनियां’ या चित्रपटाचा क्रमांक आहे.
‘गली बॉय’च्या पहिल्या दिवशीचे आकडे पाहता हा चित्रपट विकेंडलाही दमदार कमाई करेल, असा विश्वास जाणकारांनी वर्तवला आहे. आता ‘गली बॉय’च्या कमाईत आणखी किती भर पडते. हा चित्रपट आणखी कोणते विक्रम रचतो, ते पाहणे इंटरेस्टिंग असणार आहे.  

Web Title: Gully Boy box office collection on first day

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.