Good News- you will be happy when you see the Deepika Padukone's Chhapaak photo | दीपिकाच्या 'छपाक'ला घेऊन गुड न्यूज, फोटो पाहुन तुम्हीही व्हाल खुश
दीपिकाच्या 'छपाक'ला घेऊन गुड न्यूज, फोटो पाहुन तुम्हीही व्हाल खुश

ठळक मुद्देदीपिकाला ओळखणे देखील कठीण झाले होतेयात दीपिकाच्या भूमिकेचे नाव मालती आहे

दीपिका पादुकोण सध्या दिल्लीच्या उकाड्यामध्ये छपाक सिनेमाचे शूटिंग करते आहे. शूटिंग दरम्यानचे अनेक फोटो आणि व्हिडीओ व्हायरल झाले होते. या फोटो आणि व्हिडीओमध्ये दीपिका लक्ष्मी सारखीच हुबेहुब दिसत होती. अ‍ॅसिड हल्ल्यातील पीडित लक्ष्मी अग्रवाल हिचा जीवन संघर्ष या सिनेमातून पडद्यावर दाखवण्यात येणार आहे. दीपिकाला ओळखणे देखील कठीण झाले होते.


यात दीपिकाच्या भूमिकेचे नाव मालती आहे. 'छपाक' सिनेमा दीपिकाची भूमिका प्रचंड आव्हानात्मक असून सध्या ती या भूमिकेवर प्रचंड मेहनत घेत आहे. 'छपाकच्या टीमने पहिल्या शेड्यूलचे शूटिंग पूर्ण केले आहे. सिनेमाची दिग्दर्शिका मेघना गुलजारने टीमसोबतचा फोटो शेअर करुन पहिल्या शेड्यूल पूर्ण केल्याचे सांगितले आहे.     


दीपिकाला या भूमिकेसाठी मेकअप करण्यासाठी जवळजवळ तीन-चार तास लागतात आणि पुन्हा हा मेकअप काढण्यासाठी त्यापेक्षा देखील अधिक वेळ लागतो. यासिनेमा मधून दीपिका पादुकोण निर्मिती क्षेत्रात पदार्पण करतेय.  तसेच या सिनेमाच्या निमित्ताने दीपिका आणि मेघना गुलजार पहिल्यांदाच एकत्र काम करत आहेत.

मेघनाने ज्यावेळी दीपिकाला 'छपाक'ची कथा सांगितली त्यावेळी दीपिकाला अश्रू अनावर झाले होते असे मेघनाने सांगितले होते. 'छपाक'मध्ये विक्रांत मेस्सी दीपिकाच्या पतीची आलोक दीक्षितची भूमिका साकारत आहे. हा सिनेमा १० जानेवारीला प्रदर्शित होणार आहे.


Web Title: Good News- you will be happy when you see the Deepika Padukone's Chhapaak photo
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.