GOOD NEWS! Anupam Kher and Ali Fazal's Oscar nominations! | GOOD NEWS!​ अनुपम खेर आणि अली फजल यांच्या चित्रपटांनाही आॅस्कर नामांकन!

९० व्या अ‍ॅकेडमी अवार्ड्स नामांकनांची अर्थात आॅस्कर नामांकनाची घोषणा झालीय. भारतातर्फे आॅस्करवारीसाठी पाठवला गेलेला ‘न्यूटन’ कधीच बाद झाल्याने या नामांकनात भारतीय चित्रपटाला स्थान मिळू शकले नाही. पण दोन भारतीय कलाकारांनी मात्र यंदाच्या आॅस्कर नामांकनात ‘स्थान’ मिळवलेय. होय, बॉलिवूड अभिनेते अनुपम खेर आणि अली फजल या दोघांची भूमिका असलेले दोन चित्रपट आॅस्करच्या अंतिम शर्यतीत असणार आहेत. अली फजलच्या ‘विक्टोरिया अ‍ॅण्ड अब्दुल’ला ९० व्या अ‍ॅकेडमी अवार्ड्समध्ये दोन नामांकने मिळाली आहेत. तर अनुपम खेर यांची भूमिका असलेल्या ‘द बिग सिक’ या चित्रपटाला एका श्रेणीत नामांकन मिळाले आहे.‘विक्टोरिया अ‍ॅण्ड अब्दुल’ या चित्रपटात राणी व्हिक्टोरिया आणि तिचा भारतीय नोकर अब्दुल करीम यांच्या अनोख्या संबंधांची एक अनोखी कथा दाखवली गेली आहे. या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट वेशभूषा आणि केशभूषा तसेच सर्वोत्कृष्ट कॉस्ट्यूम डिजाइन अशा दोन श्रेणीत नामांकन मिळाले आहे. या चित्रपटात बॉलिवूड अभिनेता अली फजल याने अब्दुलची भूमिका साकारली आहे. तर हॉलिवूडची वयोवृद्ध अभिनेत्री ज्युडी डेंच हिने राणी व्हिक्टोरियाचे पात्र साकारले आहे.अनुपम खेर यांच्या ‘द बिग सिक’ या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट पटकथा (ओरिजिनल) श्रेणीत नामांकन मिळाले आहे. पाकिस्तानी वंशाचा कुमैल नानजियानी आणि एमिली व्ही गार्डन यांनी ही पटकथा लिहिली आहे.
 मानव आणि समुद्रीजिवाचे मैत्र सांगणा-या गिआर्मो डेल टोरो यांच्या ‘द शेप आॅफ वॉटर’ या हॉलिवूडपटाला आॅस्करसाठी सर्वाधिक १३ वेगवेगळ्या श्रेणीत नामांकन जाहिर झालेत.

ALSO READ : ​आॅस्कर नामांकनांची घोषणा! ‘द शेप आॅफ वॉटर’ला सर्वाधिक १३ नामांकनं !!

मंगळवारी टिफनी हॅदिश आणि अँडी सर्कीस यांनी अकॅडमीचे अध्यक्ष जॉन बेली यांच्या साथीने अकॅडमीच्याच सॅम्युअल गोल्डवीन थिएटर येथे या नामांकनांची घोषणा केली. येत्या ४ मार्चला हॉलिवूड अँड हायलँड सेंटर येथील डॉल्बी थिएटरमध्ये आॅस्कर सोहळा रंगणार आहे. यंदाही जिम्मी किम्मेल हाच या सोहळ्याचा होस्ट असणार आहे. ‘शेप आॅफ वॉटर’ शिवाय ख्रिस्तोफर नोलन यांचा ‘डंकर्क’ , गोल्डन ग्लोबमध्ये महत्त्वाचे पुरस्कार पटकावलेला ‘थ्री बिलबोर्ड आऊटसाइड एबिंग , मिझूरी’, स्टीवन स्पीलबर्ग दिग्दर्शित ‘द पोस्ट’, ‘फॅण्टम थ्रेड’, ‘डार्केस्ट अवर’, ‘द पोस्ट’, ‘गेट आऊट’, ‘कॉल मी बाय युवर नेम’ , ‘लेडी बर्ड’ हे चित्रपट यंदा आॅस्करच्या शर्यतीत आहेत.
Web Title: GOOD NEWS! Anupam Kher and Ali Fazal's Oscar nominations!
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.