Golmaal Again title track: 26 years old Ajay Devagan appeared in style! | Golmaal Again title track: ​ २६ वर्षे जुन्या स्टाईलमध्ये दिसला अजय देवगण!

रोहित शेट्टी दिग्दर्शित ‘गोलमाल अगेन’ या चित्रपटाचा टायटल ट्रॅक रिलीज झालाय. या गाण्यात रोहित शेट्टीने सर्व कलाकारांना एका फ्रेममध्ये आणले आहे.  सर्व कॅरेक्टर्स रोहित शेट्टी स्टाईलमध्ये दिसत आहेत. अभिनेत्री तब्बू ही तर या गाण्यात एकदम हटके रूपात दिसतेय. अजय देवगणचे म्हणाल तर तो भन्नाट स्टंट करताना दिसतोय. आपल्या ‘फुल और कांटे’ या डेब्यू सिनेमात अजय असाच एक स्टंट करताना दिसला होता. फरक इतकाच की,‘फुल और कांटे’मध्ये अजयने  हा स्टंट बाईकवर केला होता तर ‘गोलमाल अगेन’मध्ये त्याने हा स्टंट कारवर केला आहे. हा स्टंट अजयसाठी लकी मानला जातो. रोहितच्या प्रत्येक चित्रपटात कार असतात. या चित्रपटाच्या ट्रेलरमध्येही गाड्यांचा शानदार वापर झालेला दिसत आहेत. अजय दोन गाड्यांवर उभा आहे आणि बरोबर संतुलन साधतोय, असे एक दृश्य या गाण्यात आहे. हेच दृश्य म्हणजे अजयचा लकी स्टंट. तेव्हा हा स्टंट तुम्ही बघायलाच हवा. शिवाय हा स्टंट आणि चित्रपटाचा टायटल ट्रॅक कसा वाटला हे आम्हाला कळवायला हवे. खालील कमेंट बॉक्समध्ये तुम्ही तुमच्या प्रतिक्रिया लिहू शकता.ALSO READ : watch : ​कॉमेडी अन् हॉररचा तडका असलेला ‘गोलमाल अगेन’चा ट्रेलर पाहाच!

 काल परवाच कॉमेडी आणि हॉररचा तडका असलेला या चित्रपटाचा ट्रेलर आऊट झाला होता. पाठोपाठ हा टायटल ट्रॅक रिलीज  झाल्याने प्रेक्षकांची या चित्रपटाबद्दलची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. अभिनेत्री तब्बू या चित्रपटात कॉमेडी करताना दिसणार आहे. होय,  ‘गोलमाल अगेन’मध्ये करिना कपूरच्या जागी तब्बूची वर्णी लागली आहे. सोबत अर्शद वारसी, तुषार कपूर, कुणाल खेमू , परिणीती चोप्रा अशा सगळ्यांची साथ आहेच. गोलमाल सीरीजमधला पहिला चित्रपट गोलमाल २००६मध्ये आला होता.  त्यानंतर प्रत्येकी दोन वर्षांच्या अंतरान ‘गोलमाल रिटर्न्स’ आणि ‘गोलमाल 3’ आला होता. त्यानंतर तब्बल सात वर्षांनंतर रोहित शेट्टी ‘गोलमाल अगेन’ हा चित्रपट घेऊन येतो आहे.  येत्या आक्टोबरमध्ये हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटिला येणार असल्याचे समजतेय. 
Web Title: Golmaal Again title track: 26 years old Ajay Devagan appeared in style!
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.