go crazy: Malaika Arora's fitness app will come! | go crazy : ​मलायका अरोराचे फिटनेस अ‍ॅप येणार!

मलायका अरोरा ही बॉलिवूडची हॉटेस्ट अभिनेत्री आहे. कदाचित जिममध्ये घाम गाळण्याचा हा परिणाम आहे. आता मल्ला (होय, मलायकाचे जवळचे मित्र तिला याच नावाने बोलवतात) आपल्या चाहत्यांनाही फिटनेसचे धडे देताना दिसणार आहे. होय, स्वत:च्या फिटनेसची अनेक रहस्ये या अ‍ॅपद्वारे ती शेअर करणार आहे. खरे तर मलायका केवळ फॅशन आणि शॉपिंगबद्दलच बोलत असेल, असेच अनेकांना वाटेल. पण नाही, फॅशन व शॉपिंगपेक्षा मलायका स्वत:च्या फिटनेसबाबत क्रेझी आहे. पौष्टिक आहार कसा घ्यायचा, फिट कसे राहायचे हे ती आपल्या चाहत्यांना सांगणार आहे. विशेष म्हणजे, या अ‍ॅपवर तुम्ही मलायकाला थेट प्रश्न विचारू शकणार आहात. तुमच्या फिटनेससंदर्भातील प्रश्नांना मलायका स्वत: उत्तरे देईल.
एका सूत्राने सांगितले की, मलायका केवळ फॅड वा ट्रेंड म्हणून फिटनेसबद्दल बोलत नाही तर मुळातच ती याबाबत कमालीची दक्ष आहे. वर्क आऊट आणि पौष्टिक आहार याबाबत ती कमालीची जागृत आहेत. मलायका स्वत: अजिबात डाएट करत नाही. ती सगळे खाते. अर्थात आपण काय खातोय आणि महत्त्वाचे म्हणजे किती खातोय, याकडे तिचे लक्ष असते. स्वत:ला फिट ठेवण्यासाठी ती डान्स, वेट ट्रेनिंग, योगा असे सगळे करते. यावर्षीच्या अखेरिस मलायकाचे हे फिटनेस अ‍ॅप लॉन्च होईल, अशी शक्यता आहे.

ALSO READ : घटस्फोटानंतर मलाइका अरोरा झाली आणखी बोल्ड; शेअर केला टॉपलेस फोटो!

काल आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या कार्यक्रमात मलायका उत्साहात सहभागी झाली होती. मुंबईच्या मरीन ड्राईव्हवर आयोजित कार्यक्रमात मलायका दिसली होती. केवळ मलायकाच नाही तर तिचा एक्स हसबण्ड अरबाज खानही यावेळी हजर होता. मलायका व अरबाजचे १९९८ मध्ये लग्न झाले होते. मात्र गतवर्षी दोघांनीही एकमेकांपासून विभक्त होण्याचा निर्णय घेत, घटस्फोट घेतला.
Web Title: go crazy: Malaika Arora's fitness app will come!
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.