The girl was confronted by two Kajol; Then it was her reaction, see the video! | दोन काजोल बघून मुलगी न्यासाचा झाला गोंधळ; मग अशी होती तिची रिअ‍ॅक्शन, पाहा व्हिडीओ!

अभिनेत्री काजोल भलेही सध्या चित्रपटांमध्ये अ‍ॅक्टिव्ह नसली तरी, तिची लोकप्रियता कमालीची आहे. कधीकाळी आपल्या अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकणाºया काजोलचे चाहते केवळ भारतातच नाहीत तर जगभरात आहेत. काही दिवसांपूर्वीच काजोलचा मेणाचा पुतळा उभारला जाणार असल्याची बातमी समोर आली होती. त्यानुसार काजोलचा मेनाचा पुतळा मॅडम तुषाद म्युझियममध्ये उभारण्यात आला आहे. तिचा हा पुतळा सिंगापूरमध्ये ठेवण्यात आला आहे. आपल्याच स्टॅच्यूच्या उद्घाटनासाठी सिंगापूरला पोहोचलेल्या काजोलचे काही फोटोज् आणि व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. 
 

गुरुवारी काजोलच्या मेणाच्या पुतळ्याचे अनावरण करण्यात आले. यावेळी काजोल मुलगी न्यासासोबत त्याठिकाणी उपस्थित होती. काजोलने आपल्या पुतळ्यासोबत काही फोटोही क्लिक केले. त्याचबरोबर जेव्हा ती पुतळ्याजवळ उभी राहिली, तेव्हा मुलगी न्यासाचा एकच गोंधळ उडाला होता. त्याबाबतचा एक व्हिडीओ सध्या समोर येत आहे. व्हिडीओमध्ये न्यासाने मम्मी काजोलचा स्टॅच्यू बघितल्यानंतर असे काही रिअ‍ॅक्शन दिले की, जणू काही तिचा यातील आपली मम्मी नेमकी कोणती असाच काहीसा गोंधळ झाला असावा असे दिसते. 
 

दरम्यान, सध्या काजोल तिच्या आगामी ‘ईला’ या चित्रपटामध्ये व्यस्त आहे. या चित्रपटाची निर्मिती प्रदीप सरकार करीत आहेत. हा चित्रपट १४ सप्टेंबर २०१८ रोजी प्रदर्शित होणार आहे. दरम्यान, काजोल गेल्या बुधवारी विमानतळावर बघावयास मिळाली होती. आपल्या पुतळ्याचे अनावरण करण्यासाठीच ती मुंबईहून सिंगापूरला रवाना झाली होती. यावेळेस तिने विमानतळावर उपस्थित असलेल्या चाहत्यांना अभिवादनही केले. 
Web Title: The girl was confronted by two Kajol; Then it was her reaction, see the video!
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.