Gift to Johar gave Amitabh Bachchan's birthday to his fancy | अमिताभ बच्चन यांच्या वाढदिवसाला त्यांच्या फॅन्सना करण जोहरने दिले गिफ्ट

करण जोहरने अक्षय कुमारबरोबर करणार असलेल्या 'केसरी' चित्रपटाची घोषणा याआधीच केली होती. त्यानंतर त्याने महानायक अमिताभ बच्चन ह्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने आपल्या "ब्रह्मस्त्र" या  चित्रपाटची घोषणा केली आहे. या चित्रपटात रणबीर कपूर आणि आलिया भट्टसोबत बिग बी अमिताभ बच्चन ही झळकणार आहेत. हा एक  फँटसी आणि ऍडव्हेंचर चित्रपट आहे. ज्याचे दिग्दर्शन अयान मुखर्जी करतो आहे. तर  करण जोहर त्याची निर्मिती करणार आहे. 

कारण जोहर ने आपल्या ट्विटर अकाऊंटवर हे ही जाहीर केले की 'ब्रह्मस्त्र' चा पहिला भाग १५ ऑगस्ट २०१९ ला रिलीज केला जाईल.  आपणास सांगू इच्छितो की  फार दिवसापासून आलिया भट्ट आणि रणबीर कपूर एकाच चित्रपटात दिसणार असल्याच्या बातम्या येत होत्या. या चित्रपटासाठी रणबीरने घोडेस्वारी आणि जिम्नॅस्टिकची ट्रेनिंग घ्यायला सुरुवात सुद्धा केली आहे. या चित्रपटाचे नाव आधी 'ड्रॅगन' असे होते. अयान मुखर्जी भरपूर दिवसांपासून या चित्रपटाच्या स्क्रिप्टवर काम करत होते . ज्यामध्ये एक सुपरहिरो आहे आणि त्याच्याकडे अद्नभुत शक्ति आहे. या कथेला अनुसरून करण जोहरने या चित्रपटाचे नाव 'ब्रह्मस्त्र' असे ठेवले आहे. हा चित्रपट ३ भागात बनणार आहे. ज्याचा पहिला भाग २०१९ मध्ये रिलीज होईल.पहिल्यांदाच आलिया आणि रणबीर एकत्र स्क्रिन शेअर करताना दिसणार आहेत. 

कालच बिग बीनी आपल्या वाढदिवस कुटुंबीयांसोबत मालदीवमध्ये साजरा केला. सध्या अमिताभ छोट्या पड्यावरील 'कौन बनेगा करोडपती' च्या शूटिंगमध्ये व्यस्त आहेत. तसेच ते  आमीरखान बरोबर 'ठ्ग्स ऑफ हिंदुस्तान" शूटिंग ही करतायेत. तर आलियाने नुकतेच मेघना गुलजार दिग्दर्शित राजी चित्रपटाचे शूटिंग पूर्ण केले आहे. या चित्रपटात आलिया एका काश्मीरी मुलीची भूमिका साकारणार आहे. जिचे लग्न एका पाकिस्तानी अधिकाऱ्याशी होते. 1971साली झालेल्या भारत-पाकिस्तान युद्धादरम्यान ती भारतातील गुप्त माहिती पाकिस्तानी अधिकाऱ्यांना देते. या चित्रपटात आलियासह अभिनेता विकी कौशल ही दिसणार आहे. 
Web Title: Gift to Johar gave Amitabh Bachchan's birthday to his fancy
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.