Gauri Khan shared a photo of Abrams on the birthday! | अब्रामच्या बर्थडेनिमित्त आई गौरी खानने शेअर केला क्यूट फोटो!

बॉलिवूडचा बादशाह शाहरूख खान सगळया चाहत्यांच्या दिलाचा राजा आहे. मात्र, त्याच्या काळजाचा तुकडा तर कोणी दुसराच आहे... कोण आहे तो? त्याचा धाकटा मुलगा अब्राम. शाहरूख आणि गौरीला त्याच्यासोबत वेळ घालवायला खूप आवडते. अब्राम हा देखील कुण्या सेलिब्रिटीपेक्षा कमी नाही. नुकताच गौरी खानने अब्रामच्या वाढदिवसानिमित्त त्याच्यासोबतचा क्यूट फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. या फोटोत दोघेही जण कमालीचे खुश दिसत आहेत. काही दिवसांपूर्वी सुहाना खानने तिचा १८ वा वाढदिवस साजरा केला. सुहानाच्या वाढदिवसाला गौरीने सोशल मीडियावर सुहानाचा एक ग्लॅमरस फोटो शेअर केला होता. आता गौरीने पुन्हा एकदा अब्रामच्या वाढदिवसाचे औचित्य साधून त्याच्यासोबतचा एक फोटो शेअर केला आहे. अब्रामचा हा आनंदी असलेला हा फोटो शेअर करत तिने त्याला वाढदिवसाच्या शुभेच्छाही दिल्या.गौरीने सोशल मीडियावर अब्रामसोबतचा फोटो शेअर करत लिहिले की, ‘वाढदिवसाच्या शुभेच्छा’. या फोटोत अब्राम फार क्यूट आणि आनंदी दिसत आहे. तर गौरीही त्याचे लाड करताना दिसते. काही दिवसांपूर्वी अब्रामबद्दल बोलताना शाहरुख म्हणाला होता की, ‘तो माझ्याबाबतीत फार प्रोटेक्टिव्ह आहे. जेव्हा तो टीव्हीवर मला कोणीतरी मारतंय असा सीन पाहतो त्याला खरंच मला समोरची व्यक्तीने मारल्याचे वाटते. त्यानंतर जेव्हाही तो त्या व्यक्तीला भेटतो त्याच्याकडे पूर्णवेळ रागानेच पाहतो. अब्राम फार हुशार आहे. मला त्याच्यासोबत वेळ घालवायला फार आवडतं. त्याच्यासोबत मीही अनेकदा पुन्हा एकदा लहान मुलगा होतो.’

मागील काही दिवसांपासून शाहरुख आपला मुलगा अबरामसोबत खेळताना दिसला आहे. त्याने त्याच्याविषयीचे अनेक किस्से देखील मीडियासमोर उघड केले आहेत. एका मुलाखतीमध्ये अबराम हा नव्या पिढीतील ‘सुपरस्टार’ असेल असे सांगितले. बॉलिवूडमधून सुपरस्टार ही संकल्पना शाहरुख खाननंतर बाद होईल या प्रश्नाच्या उत्तर देत होता. शाहरुख म्हणाला, ‘अबराम आहे ना पुढला सुपरस्टार’. अबराम फक्त तीन वर्षांचा आहे. या मुलाखतीमध्ये शाहरुखसोबत त्याचा मुलगा अबरामही होता.

Web Title: Gauri Khan shared a photo of Abrams on the birthday!
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.