Gauri Khan reached London for a trip to Leki, found out in the stunning Lucy! | लेकीच्या भेटीसाठी लंडनला पोहोचली गौरी खान, स्टनिंग लूकमध्ये दिसल्या मायलेकी !

बॉलिवूडचा किंग शाहरूख खानची मुलगी सुहाना खानचे काही फोटोज् सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. आता तिचे आणखी काही फोटोज् व्हायरल होत असून, त्यामध्ये ती मम्मी गौरी खानसोबत पोज देताना बघावयास मिळत आहे. एकीकडे गौरी फॉर्मल लूकमध्ये बघावयास मिळत आहे. तर सुहाना सिल्व्हर रंगाच्या वन साइड आॅफ शोल्डर शॉट स्लिट ड्रेसमध्ये बघावयास मिळत आहे. हा फोटो लंडनमधील एका प्रायव्हेट क्लबमधील आहे. याठिकाणी सुहाना तिच्या मैत्रीण आणि मॉमसोबत पोहोचली होती. सुहानाच्या फॅन क्लबने लंडन येथील तिचे हे फोटो शेअर केले आहेत. ज्यामध्ये ती लंडनच्या रस्त्यावर आपल्या मैत्रिणींसोबत बघावयास मिळत आहे. धीरूभाई अंबानी इंटरनॅशनल स्कूलमध्ये शालेय शिक्षण पूर्ण केल्यानंतर सुहाना लंडन येथे उच्चशिक्षण घेत आहे. सध्या ती लंडनलाच असून, मॉम गौरी तिला भेटण्यासाठी त्या ठिकाणी गेली आहे. अभिनयाची आवड असलेली सुहाना लवकरच बॉलिवूडमध्ये एंट्री करण्याची शक्यता आहे. त्यादृष्टीने ती लवकरच एक पाऊल पुढे टाकताना दिसणार आहे. याबाबतचा खुलासा स्वत: गौरीनेच काही महिन्यांपूर्वी एका इव्हेंटमध्ये केला होता. तिने म्हटले होते की, सुहाना सध्या एका मॅगझिनचे फोटोशूट करीत आहे; मात्र गौरीने यावेळी त्या मॅगझिनच्या नावाचा उलगडा केला नव्हता. दरम्यान, हे सुहानाचे पहिलेच फोटोशूट असणार आहे. सूत्रानुसार, सुहाना या मॅगझिनच्या कव्हर पेजवर झळकणार आहे. 
Web Title: Gauri Khan reached London for a trip to Leki, found out in the stunning Lucy!
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.