Gauri Khan believed that Shah Rukh should not be an actor; But why would she like that? Read their story! | गौैरी खानला वाटायचे की शाहरूखने अभिनेता होऊ नये; पण असे तिला का वाटायचे? वाचा त्यांची स्टोरी!

बॉलिवूड किंग शाहरूख खान केवळ रिल लाइफमध्येच नव्हे रिअल लाइफमध्ये रोमॅण्टिक अभिनेता आहे. शाहरूखला पत्नी गौरी खान हिच्यावर तेव्हा प्रेम जडले होते जेव्हा त्याने त्याच्या बॉलिवूड करिअरला सुरुवात केली होती. शाहरूख आणि गौरी आज बॉलिवूडमध्ये हॅप्पी कपलपैकी एक आहे. लग्नाचे २५ वर्षे झाले असतानाही दोघांमधील प्रेम तसूभरही कमी झालेली नाही. मात्र तुम्हाला हे माहीत आहे काय की, गौरीला असे वाटत होते की शाहरूखने अभिनय करू नये? होय, गौरीला वाटायचे की शाहरूखने अभिनेता होऊ नये. 

हा किस्सा शाहरूख खानच्या स्ट्रगल दिवसांमधील आहे. जेव्हा गौरी आणि शाहरूख रिलेशनशिपमध्ये होते तेव्हा गौरी शाहरूखच्या करिअरविषयी खूपच चिंतित होती. शिवाय तिला असेही वाटायचे की, दुसºया धर्माच्या मुलाचा तिच्या परिवारातील लोक स्वीकार करणार नाही. दरम्यान, त्यावेळी गौरी दिल्लीतील लेडी श्रीराम कॉलेजमध्ये फॅशन डिझायनिंगचा कोर्स करीत होती. त्यावेळी शाहरूख आणि तिच्यातील रिलेशनशिपला पाच वर्षे पूर्ण झाले होते. त्यावेळी शाहरूखला ‘दिल दरिया’ या मालिकेत काम करण्याची संधी मिळाली होती. एकीकडे शाहरूख त्याच्या करिअरला ट्रॅकवर आणण्यासाठी धडपड करीत होता, तर दुसरीकडे गौरी शाहरूखविषयी तिच्या परिवारातील लोकांना सांगण्यावरून चिंतित होती. पुढे शाहरूख त्याच्या कामात व्यस्त झाला होता, त्यामुळे तो गौरीला पुरेसा वेळ देऊ शकत नव्हता. तेव्हा गौरीने त्याला वैतागून म्हटले होते की, ‘तू अभिनय सोडून दे.’ एका साप्ताहिकात प्रसिद्ध झालेल्या मुलाखतीनुसार शाहरूखनेच याबाबतचा खुलासा केला. त्या दिवसांच्या आठवणींना उजाळा देताना शाहरूखने म्हटले की, ‘त्यावेळी गौरी माझ्याविषयी खूपच सिरियस होती. मीदेखील तिच्या प्रेमात आकंठ बुडाले होते, जर तिने स्विमसूट परिधान केला किंवा केस मोकळे सोडले तर मी तिच्याशी वाद घालायचो. माझ्यात तिच्याविषयी असुरक्षितपणाची भावना निर्माण झाली होती. कारण त्यावेळी आम्ही जास्त भेटू शकत नव्हतो.’

लेखक मुश्ताक शेख यांच्या ‘Shah Rukh Can: The Life and Times of Shah Rukh Khan’ या पुस्तकानुसार त्यावेळी शाहरूख गौरीला म्हणायचा की, ‘मी तुला असे म्हणत नाही की तू माझ्यासोबत बस, परंतु दुुसºयासोबत बसू नकोस. असो, एकमेकांप्रती असलेल्या जीवापाड प्रेमामुळेच शाहरूख आणि गौरीची ही अवस्था झाली होती. पुढे या दोघांनी २५ आॅक्टोबर १९९१ रोजी लग्न केले. मात्र त्यांच्यातील प्रेम आजही पहिल्यासारखेच आहे. शाहरूख एक परफेक्ट पती आहे. शिवाय एक परफेक्ट वडीलदेखील आहे. या दाम्पत्याला आर्यन, सुहाना आणि अबराम अशी तीन मुलगे आहेत. 
Web Title: Gauri Khan believed that Shah Rukh should not be an actor; But why would she like that? Read their story!
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.