Fuwad says, I have been in Lahore since July | फवाद म्हणतो, मी जुलैपासून लाहोरमध्येच

उरी दहशतवादी हल्ल्यानंतर बॉलिवूडमध्ये काम करणाºया पाकिस्तानी कलावंतांवर रणकंदन माजले असताना अभिनेता फवाद खान जुलै महिन्यापासून पाकिस्तानात असल्याचे सांगतो आहे. फवादने फेसबुक च्या माध्यमातून ही माहिती दिली आहे. फवाद खानसंदर्भात भारतीय मीडियात सध्या जोरदार चर्चा सुरू आहे.

बॉलिवूडमध्ये पाक क लाकाराविषयी वाद उफाळून आल्यावर त्याने भारतातून काढता पाय घेतला होता असे सांगण्यात आले. मात्र याच दरम्यान फवादच्या पत्नीने एका मुलीला जन्म दिल्याने तो परत गेला असावा असाही अंदाज लावण्यात येत होता. आता स्वत: फवादने यावर आपली बाजू मांडली आहे. 

त्याने आपल्या फेसबुकवर लांबलचक मॅसेज लिहलाय. तो म्हणतो, मी जुलै महिन्यापासून लाहोरमध्ये आहे. मी आणि माझी पत्नी आमच्या दुसºया अपत्याची वाट पाहत होतो. मला मीडिया व शुभचिंतकाच्या माध्यमातून अनेक गोष्टींची माहिती मिळाली. माझ्या वतीने लिहण्यात आलेल्या कोणत्याच गोष्टींवर विश्वास ठेऊ नका. कारण मी असे काहीच म्हणालो नाही’’. या पोस्टमधून त्याने आपल्या चाहत्यांचे आभार मानले आहेत. 

पाकिस्तानी कलावंतानी बॉलिवूडमध्ये काम करण्याहून गट पडले आहेत. यावर वेगवेगळ्या कलाकारांच्या प्रतिक्रिया येत आहेत. आता फवाद खर बोलतोय याचा विश्वास तरी कसा करावा. 

http://


Web Title: Fuwad says, I have been in Lahore since July
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.