'Fukru Returns' will be seen on the audience at 'And Pictures' | ‘अॅण्ड पिक्चर्स’वर या दिवशी प्रेक्षकांना पाहायला मिळणार ‘फुकरे रिटर्न्स’

फुकरे प्रदर्शित होऊन आता पाच वर्षांचा काळ उलटला असला, तरी हन्नी, चूचा, लाली झफर, पंडित आणि भोली पंजाबन यांना अद्याप प्रेक्षक विसरलेले नाहीत. या सर्वांना येत्या रविवारी, २० मे रोजी ‘नए इंडिया का ब्लॉकबस्टर मूव्ही चॅनल’ असलेल्या ‘अॅण्ड पिक्चर्स’वर पुन्हा भेट घेण्याची संधी प्रेक्षकांना लाभली आहे. कारण त्या दिवशी दुपारी बारा  वाजता या वाहिनीवरून ‘फुकरे रिटर्न्स’ या चित्रपटाचा ‘जागतिक टीव्ही प्रीमिअर’ प्रसारित करण्यात येणार आहे. फरहान अख्तर आणि रितेश सिधवाणी यांनी निर्मिती असलेल्या आणि मृगदीपसिंग लांबा दिग्दर्शित या चित्रपटात पुलकित सम्राट, रिचा चढ्ढा, वरुण शर्मा, अली फझल आणि मंज्योतसिंह यांच्या प्रमुख भूमिका आहेत.
‘फुकरे’ या चित्रपटाचा पुढील भाग असलेल्या फुकरे रिटर्न्स या चित्रपटाने १०० कोटी रुपयांचा गल्ला कमावला होता. धमाल अ‍ॅक्शनप्रसंगांनी भरलेल्या या चित्रपटाची कथा विनोदाचे अचूक टायमिंग, खुसखुशीत संवाद, विक्षिप्त व्यक्तिरेखा आणि उत्कृष्ट अभिनय यांनी नटली आहे. पुलकित सम्राटचा हन्नी आणि वरुण शर्माचा चूचा यांच्यातील मैत्री ही शोलेतील जय-वीरू यांच्याइतकीच प्रसिद्ध झाली असून ते निर्माण करीत असलेया विनोदाचा दर्जा मुन्नाभाई-सर्किट यांच्या विनोदासारखाच उच्च आहे. फुकरेच्या या दुसऱ्या भागात चूचा चक्क प्राणीसंग्रहालयातील एक अर्धभुकेला वाघ आणि त्याच्या बछड्याशीही मैत्री करतो आणि चित्रपटाची रंजकता एका वेगळ्याच उंचीवर नेतो. या चित्रपटात कोठेही डबल मिनिंग विनोद नसल्याने हा चित्रपट एक संपूर्ण कौटुंबिक करमणूकपट बनला असून या तरुण मित्रांपुढे उभ्या टाकणाऱ्या संकटांमुळे प्रेक्षकांची हसून हसून करमणूक होते. याविषयी अभिनेत्री रिचा चढ्ढा सांगते, “फुकरे आणि फुकरे रिटर्न्स हे दोन्ही चित्रपट माझ्या अतिशय आवडीचे आहेत. फुकरे या नावाला प्रेक्षकांकडून मिळालेलं प्रेम हे अभूतपूर्व असून आपल्याला इतर कोणत्याही चित्रपटावर त्यांनी असं प्रेम केल्याचं पाहायला मिळत नाही. मला भोली पंजाबनची व्यक्तिरेखा खूप आवडते कारण तिच्या कोणत्याच गोष्टीला कसलीच मर्यादा नाही. तिला जे योग्य वाटतं, ते ती बेधडक करते. फुकरे रिटर्न्स हा एक साधा विनोदी चित्रपट असून तो आपल्या मुलाबाळांबरोबरही बसून बघता येण्यासारखा आहे.”

Also Read : रिचा चढ्ढा सांगतेय, अभिनेत्री नसते तर मी असते या प्रोफेशनमध्ये

Web Title: 'Fukru Returns' will be seen on the audience at 'And Pictures'
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.