'Fukko' for the film 'Star Ali Fazal reduced so much weight! | ‘या’ चित्रपटासाठी ‘फुकरे’ स्टार अली फजलने घटवले इतके किलो वजन!!

एखाद्या भूमिकेसाठी वजन घटवणे, वाढवणे हे बॉलिवूड सेलिब्रिटींसाठी नवे राहिलेले नाही. आता या यादीत आणखी एक अभिनेता सामील झाला आहे. या अभिनेत्याचे नाव काय तर अली फजल. होय, ‘मिलन टॉकिज’ या आगामी चित्रपटासाठी अलीने १० किलो वजन घटवले. स्क्रिप्टच्या मागणीनुसार, त्याने हे केले. अर्थातच हे सोपे नव्हते. कारण यापूर्वी ‘मिर्झापूर’ या वेबसीरिजसाठी त्याने १४ किलो वजन वाढवले होते. फोकस आणि दृढ इच्छाशक्तीच्या जोरावरचं अली हे करू शकला.  
अलीने याबद्दल सांगितले की, १० किलो वजन कमी करणे हे वरवर सोपे वाटत असले तरी ते इतकेही सोपे नाही. यासाठी लागते ती दृढ इच्छाशक्ती. विशेषत: डाएटच्या बाबतीत कडक नियम पाळणे सर्वाधिक कठीण असते. वजन कमी करण्यासाठी मी कडक डाएट फॉलो केले. रोज ५ किमीपेक्षा अधिक  धावलो. बराच घाम गाळला. प्रयत्न केले तर काहीही कठीण नाही, हे या आव्हानातून मी शिकलो.अली हा ‘फुकरे’ आणि ‘फुकरे रिटर्न्स’ सारख्या चित्रपटांसाठी ओळखला जातो. आपल्या दमदार अभिनयासाठी ओळखला जाणाºया अलीने स्वबळावर बॉलिवूडमध्ये एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. अभिनयाच्याच जोरावर अली हॉलिवूड चित्रपटांतही दिसला आहे. ‘फास्ट अ‍ॅण्ड फ्युरिअस7’आणि ‘व्हिक्टोरिया अ‍ॅण्ड अब्दुल’ या दोन हॉलिवूडपटात अली दिसला होता.

ALSO READ : Oscar 2018 : प्री-आॅस्कर पार्टीत ऋचा चढ्ढासोबत सहभागी झाला अली फजल!

‘मिलन टॉकिज’हा चित्रपट एका चित्रपटगृहाची कथा आहे.  मल्टीप्लेक्सच्या काळात सिंगल स्क्रिन चित्रपटगृहांना उतरती कळा लागली आहे. ‘मिलन टॉकिज’ याच संघर्षावर आधारित आहे. येत्या मार्चमध्ये उत्तर प्रदेशातील लखनौ, मथुरा आणि वृंदावन येथे या चित्रपटाचे शूटींग होणार आहे. ‘पान सिंह तोमर’,‘हासिल’,‘साहब बीवी और गँगस्टर’ सारख्या चित्रपटांसाठी ओळखला जाणारा दिग्दर्शक तिग्मांशू धूलिया हा चित्रपट साकारतो आहे. यात अली फजल हा लखनौतील एका लहानशा गावातील तरूणाची भूमिका साकारताना दिसणार आहे. अलीशिवाय श्रद्धा श्रीनाथ, ऋचा सिन्हा, दीपराज राणा यात प्रमुख भूमिकांमध्ये आहेत.

Web Title: 'Fukko' for the film 'Star Ali Fazal reduced so much weight!
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.