Friends, meet my dude ...! Rakhi Sawant gets 'Dosha' for 'Converse Queen' !! | ​दोस्तों, मेरे दुल्हे से मिलिए...! ‘कॉन्टोवर्सी क्वीन’ राखी सावंतला मिळाला ‘दुल्हा’!!

‘कॉन्टोवर्सी क्वीन’ राखी सावंत काहीही करो, त्याची बातमी होणार म्हणजे होणार. तिच्या ताज्या व्हिडिओचीही अशीच बातमी झालीय. होय, सोशल मीडियावर स्वत:चे बोल्ड फोटो आणि व्हिडिओ पोस्ट करणा-या राखीने एक नवा व्हिडिओ पोस्ट केला आहे. या व्हिडिओत राखी व तिचा ‘नवरदेव’ दिसतोय. ‘दोस्तों मेरे दुल्हे से मिलिए...मोदी जी अपने दामाद को मिल लो...देखिए कितना स्मार्ट है...’ असे राखीने या व्हिडिओत म्हटले आहे.
सगळ्यांना माझ्या लग्नाची प्रतीक्षा होती. खूप शोधूनही भारतात मला मुलगा मिळाला नाही. पण इथे न्यूयॉर्कमध्ये मला माझा होणारा नवरा मिळाला आहे. बघा, माझा होणारा नवरा किती स्मार्ट आहे...असे राखी व्हिडिओत म्हणतेय. विशेष म्हणजे, आपल्या या होणाºया नव-याला ती स्वत:ची ओळखही करून देतेय. मी बॉलिवूड अभिनेत्री आहे. भारताचे पंतप्रधान मोदीजी माझे खूप मोठे चाहते आहेत, असे तिने म्हटले आहे. आता या व्हिडिओत किती सत्यता आहे, हे आम्हाला ठाऊक नाही. म्हणजे, राखी खरोखरचं लग्न करतेयं की हा व्हिडिओ केवळ गमतीचा भाग आहे, हे तिलाच ठाऊक़ पण खरे सांगायचे तर राखीला नववधूच्या वेशात पाहायला तिचे चाहते उत्सूक आहेत. ‘राखी का स्वंयवर’ या शोमध्ये राखीने नवरा मुलगा निवडला. पण त्याचेसोबत तिने मात्र लग्न केले नाही. आता राखी गंभीरपणे लग्नाचा विचार करत असेल तर चाहत्यांना आनंद होणारच.

ALSO READ : राखी सावंतने जगजाहीर केली तिची ‘ही’ पर्सनल गोष्ट, व्हिडीओ झाला व्हायरल!

कायम वाद ओढवून घेणारी राखी ‘कान्ट्रोवर्सी क्वीन’ नावाने ओळखली जाते.   अमेरिकेतील दहा मोठ्या शहरांमध्ये डान्स अकॅडमी सुरू करणार असल्याची घोषणा राखीने अलीकडे केली होती.. राखीच्या वर्कफ्रंटविषयी सांगायचे झाल्यास लवकरच ती रामरहीमच्या जीवनावर आधारित एका वादग्रस्त चित्रपटात त्याची कथित मुलगी हनीप्रीतची भूमिका साकारताना बघावयास मिळणार आहे.  राखीने या चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात केली होती, तेव्हा तिने हनीप्रीत आणि रामरहीमबद्दल अनेक वादग्रस्त वक्तव्ये केली होती.  राखी लवकरच एक आयटम नंबर करतानाही बघावयास मिळणार आहे. 
Web Title: Friends, meet my dude ...! Rakhi Sawant gets 'Dosha' for 'Converse Queen' !!
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.