Forbes’ list : अक्षय कुमार बनला बॉलिवूडचा सर्वाधिक कमाई करणारा अभिनेता

By ऑनलाइन लोकमत | Published: July 11, 2019 01:45 PM2019-07-11T13:45:42+5:302019-07-11T13:45:54+5:30

बॉलिवूडचा खिलाडी अक्षय कुमार सध्याचा सर्वाधिक बिझी स्टार आहे. आता अक्षयने जगभरातील सर्वाधिक कमाई करणा-या अभिनेत्यांच्या यादीत स्थान मिळवले आहे.

forbes highest paid celebrities list is out now bollywood actor akshay kumar grabbed the 33rd spot | Forbes’ list : अक्षय कुमार बनला बॉलिवूडचा सर्वाधिक कमाई करणारा अभिनेता

Forbes’ list : अक्षय कुमार बनला बॉलिवूडचा सर्वाधिक कमाई करणारा अभिनेता

googlenewsNext
ठळक मुद्दे गतवर्षी या यादीत 40.5 मिलियन डॉलरची कमाईसह अक्षय 76 व्या स्थानावर होता. यावर्षी त्याने 33 व्या स्थानावर झेप घेतली आहे.

बॉलिवूडचा खिलाडी अक्षय कुमार सध्याचा सर्वाधिक बिझी स्टार आहे. आता अक्षयने जगभरातील सर्वाधिक कमाई करणा-या अभिनेत्यांच्या यादीत स्थान मिळवले आहे. फोर्ब्स मॅगझीनने नुकतीच जगभरातील सर्वाधिक कमाई करणा-या अभिनेत्यांच्या नावाची यादी जाहीर केली. या यादीत स्थान मिळवणारा तो एकमेव बॉलिवूड अभिनेता आहे. बॉलिवूडच्या तिन्ही खानांना मात देत अक्षयने या यादीत 33 वे स्थान मिळवले आहे. अक्षयसोबत या यादीत रिहाना, स्कारलेट जॉन्सन, क्रिस इवन्स, केटी पेरी, ब्रेडली कूपर, जॅकी चॅन आणि लेडी गागा या हॉलिवूड स्टार्सच्या नावांचा समावेश आहे. गतवर्षी या यादीत 40.5 मिलियन डॉलरची कमाईसह अक्षय 76 व्या स्थानावर होता. यावर्षी त्याने 33 व्या स्थानावर झेप घेतली आहे.



 

फोर्ब्सच्या या यादीत गायिका टेलर शिफ्ट अव्वल स्थानी आहे. 2016 मध्येही टेलर या यादीत पहिल्या क्रमांकावर होती. दुस-या क्रमांवर काइली जेनर आणि तिस-या क्रमांकावर केनी वेस्टने बाजी मारली आहे. फोर्ब्सची ही यादी सेलिब्रिटींचे वर्षभरातील उत्पन्न आणि त्यांची प्रसिद्धी यावरून तयार करण्यात येते. अक्षयच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचे झाल्यास सध्या तो मिशन मंगल आणि सूर्यवंशी या चित्रपटात बिझी आहे. याशिवाय साऊथचा सुपरहिट चित्रपट ‘कंचना’चा  हिंदी रिमेक ‘लक्ष्मी बॉम्ब’मध्येही त्याची वर्णी लागली आहे. ‘गुड न्यूज’ आणि ‘हाऊसफुल 4’ या चित्रपटातही तो झळकणार आहे. काही तासांपूर्वी ‘मिशन मंगल’चा टीजर प्रदर्शित झाला. येत्या 15 आॅगस्टला हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या चित्रपटात सोनाक्षी सिन्हा, विद्या बालन, तापसी पन्नू मुख्य भूमिकेत आहेत.

Web Title: forbes highest paid celebrities list is out now bollywood actor akshay kumar grabbed the 33rd spot

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.