'This is the first time Romance from Ancrina for' this' movie 'Real Life Couple!' | ‘या’ चित्रपटातून पहिल्यांदा आॅनस्क्रिन रोमान्स करणार ‘हे’ रिअल लाइफ कपल!

अभिनेता अली फजल आणि ऋचा चढ्ढाने एकत्र दोन चित्रपट केले आहेत. मात्र पहिल्यांदा हे रिअल लाइफ कपल स्क्रीनवर रोमान्स करताना बघावयास मिळणार आहे. दोघे एका रॉम-कॉम मुव्हीमध्ये दिसणार आहेत. लॉस एंजेलिसच्या एका दिग्दर्शकाने या दोघांना कास्ट करण्याचा निर्णय घेतला आहे. अली फजलने या अगोदरही हॉलिवूडमधील काही चित्रपटांमध्ये काम केले आहे. अलीने या अगोदर ‘फास्ट अ‍ॅण्ड फ्यूरियस-७’ आणि ‘व्हिक्टोरिया अ‍ॅण्ड अब्दुल’ या चित्रपटांमध्ये काम केले आहे. 

डीएनएमध्ये प्रसिद्ध झालेल्या एका रिपोर्टनुसार, हा प्रोजेक्ट गेल्या आठवड्यातच फायनल करण्यात आला. त्यावेळी दोघेही सुट्या एन्जॉय करण्यासाठी स्विर्त्झरलॅण्डमधील जिनेवा शहरात होते. त्याठिकाणीच हा प्रोजेक्ट लॉक करण्यात आला. वास्तविक अद्यापपर्यंत चित्रपटाचे टायटल आणि दिग्दर्शकासोबत खुलासा करण्यात आलेला नाही. खरं तर हे पहिल्यांदाच नाही की, ऋचा आणि अली पहिल्यांदा एखाद्या चित्रपटात एकत्र बघावयास मिळतील. या अगोदर हे दोघे ‘फुकरे’ आणि ‘फुकरे रिर्टन्स’मध्ये बघावयास मिळाले आहेत. जर या प्रोजेक्टवर काम केले गेले तर दोघे पहिल्यांदा रोमान्स करताना बघावयास मिळणार आहेत. 

दरम्यान, रिपोर्टमध्ये हेदेखील सांगण्यात आले की, या चित्रपटाची शूटिंग याच वर्षी सप्टेंबरमध्ये सुरू केली जाणार आहे. हा एक भारतीय प्रोजेक्ट असणार आहे, ज्याची शूटिंग भारत आणि अमेरिकेत केली जाणार आहे. अलीने नुकतेच तिग्मांशू धुलिया यांच्या ‘मिलन टॉकीज’ या चित्रपटाची शूटिंग पूर्ण केली आहे. दरम्यान, हे रिअल लाइफ कपल पहिल्यांदाच आॅनस्क्रिन रोमान्स करताना बघावयास मिळणार आहे. त्यांच्या चाहत्यांसाठी हा एक मजेशीर अनुभव असणार आहे. आता चाहत्यांना त्यांच्या या चित्रपटाची उत्सुकता लागली आहे. 
Web Title: 'This is the first time Romance from Ancrina for' this' movie 'Real Life Couple!'
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.