The first time I talked about my relationship with Hardik! | हार्दिकसोबतच्या नात्याबाबत पहिल्यांदाच बोली एली अवराम !

गेल्या अनेक दिवसांपासून हार्दिक पंड्या आणि एली अवराम यांच्या रिलेशनशीपला घेऊन चर्चा आहे. गेल्या अनेक दिवसांपासून दोघे एकमेकांना डेट करत असल्याचे समजते आहे. या सगळ्या प्रकरणाची सुरुवात हार्दिक पंड्याचा भावाच्या लग्नापासून झाली. त्याचे झाले असे की हार्दिकचा भाऊ कुणाल पंड्याच्या लग्नात एली पोहोचली होती.  या लग्ना दरम्यानचा हार्दिकसोबतचा एलीचा सोशल मीडियावर व्हायरल झाला. दोघांमधील वाढत्या जवळीकतेला बघून हा अंदाज लावण्यात येतो आला की दोघे मीडियाच्या नजरेपासून लपून एकमेकांना डेट करतायेत.   नुकतेच हिंदुस्तान टाइम्सला दिलेल्या मुलाखती दरम्यान एली या संपूर्ण प्रकरणावर म्हणाली, लोक जे माझा आणि हार्दिकच्या बाबतीत विचार करतायेत त्यांना करु देत. तसे ही मी यावर काही बोलले तर त्याच्या बातम्या तयार करण्यात येतील. यापेक्षा चांगले आहे माझ गप्पच राहणे. जेव्हा तुम्ही एक ओळखची चेहरा असतात तेव्हा लोक तुमच्याबदल बोलणे पसंत करतात. याआधी ही माझ्या बाबतीत खूप बोलले गेले आहे. त्यामुळे याही प्रकरणावर मी गप्प राहणेच पसंत करेन.

एलीने सांगितले जर मी हार्दिक आणि माझ्या नात्याबाबत कितीही खरे सांगण्याचा प्रयत्न केले तर लोकांना ते खोटेच वाटणार. यापेक्षा चांगले ही मी मौनच धारण करेन.   
भारतीय क्रिकेट टीम साऊथ आफिक्रेच्या दौऱ्यावर सध्या आहे. यावेळी अनेक क्रिकेटर्सच्या पत्नी त्यांच्यासोबत या दौऱ्यावर गेल्या होत्या. साऊथ आफ्रिकेमध्ये पार्टी करताना शिखर धवनच्या बायकोना शेअर केलेल्या फोटोत साऊथ आफ्रिकेमधील फोटोत एली पण दिसली होती त्यानंतर पुन्हा एकदा चर्चांना उधाण आले. एलीच्या आधी हार्दिकचे नाव परिणीती चोप्रासोबत सुद्धा जोडण्यात आले होते. 

बिग बॉस या वादग्रस्त शोच्या सीजन-७ मध्ये सहभागी झाली होती.  बिग बॉसच्या घराबाहेर पडल्यानंतर तिला ‘मिकी वायरस’ या चित्रपटाची आॅफर मिळाली. पुढे ती ‘किस किस को प्यार करू’, ‘नाम शबाना’ या चित्रपटातही बघावयास मिळाली.
Web Title: The first time I talked about my relationship with Hardik!
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.