First sight of 'Bahubali' will come in Prabhas' Birthday! | प्रभासच्या बर्थडेला येणार ‘बाहुबली’ चा फर्स्ट लुक !

 ‘बाहुबली: द बिगिनिंग’ या पहिल्या चित्रपटाला बॉक्स आॅफीसवर चाहत्यांनी उत्तम प्रतिसाद दिला. आता त्याचा दुसरा भाग ‘बाहुबली : द कन्क्ल्युजन’ हा चित्रपट लवकरच प्रदर्शित होईल.

अद्याप तारीख कळाली नसून चित्रपटाचा फर्स्ट लुक दाक्षिणात्य अभिनेता प्रभास याच्या वाढदिवसाच्या दिवशी म्हणजेच २३ आॅक्टोबरला आऊट करण्यात येणार असल्याचे कळते आहे. निर्मात्यांनी २३ आॅक्टोबरला ‘डबल धमाका’ करायचा ठरवले आहे.

दिग्दर्शक एस.एस. राजामौली हे ‘बाहुबली’ ला बर्थडे गिफ्ट म्हणून चित्रपटाचा फर्स्ट लुक द्यायचा असे त्यांनी ठरवले आहे. प्रभासच्या चाहत्यांसाठी ही डबल ट्रीट ठरणार आहे.
Web Title: First sight of 'Bahubali' will come in Prabhas' Birthday!
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.