First poster out of 'seven takers' | ​‘सात उचक्के’चे पहिले पोस्टर आऊट

संजीव शर्मा दिग्दर्शित ‘सात उचक्के’ या आगामी चित्रपटाचे  पहिले पोस्टर आज जारी करण्यात आले. चित्रपटाच्या शिर्षकाप्रमाणेच हे पोस्टरही मजेदार आहे. मनोज वाजपेयी, अनुपम खेर, विजय राज, केके मेनन, अन्नू कपूर आदी कसलेले कलाकार या चित्रपटात आहेत. सोबत अदिती शर्मा आणि आयुष्यमान खुराणा याचा भाऊ अपारशक्ती खुराणा हा सुद्धा या चित्रपटात दिसणार आहे.‘सात उचक्के’ या पोस्टरमध्ये ठिकठिकाणी बस स्थानक व शौचालयाच्या भींतींवर दिसतात तशा शिव्या दिसत आहे. ट्रेड अ‍ॅनालिस्ट तरण आदर्श याने या चित्रपटाचे पोस्टर टिष्ट्वटरवर शेअर केले आहे. हा चित्रपट येत्या १४ आॅक्टोबरला प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.


Web Title: First poster out of 'seven takers'
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.