First Look is not a joke! | फर्स्ट लूक नव्हे हा तर विनोद!

इम्तियाज अली दिग्दर्शित  ‘दी रिंग’ या चित्रपटाचा फर्स्ट लूक शाहरुख खानने आपल्या टिष्ट्वटर अकाऊंटवर पोस्ट केला. पण हा फर्स्ट लूक पाहून अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला. पण काहीच तासांत  ‘मी नुसती गंमत केलीयं’, असे सांगून शाहरूखला खुलासा करावा लागला.

शाहरुख खान सध्या बुडापेस्टमध्ये ‘द रिंग’ या चित्रपटाच्या शूटिंग करीत आहे. रात्री अचानक त्याने एक ट्विट करून ‘द रिंग’चा फर्स्ट लूक पहा अशी पोस्ट केली. यासोबत एक फोटोही शेअर केला. या फोटोत शाहरुख व अनुष्का थंडीपासून बचाव करताना दिसत आहेत. त्याचे नाक, कान, डोके सगळेच झाकलेले आहे. या फोटोसोबत त्याने लिहलेय...

‘‘ इम्तियाज अली दिग्दर्शित करीत असलेल्या ‘दी रिंग’चा फर्स्ट लूक, या चित्रपटाचे कथित नाव ‘दी रिंग’ सांगण्यात येत आहे. हा चित्रपट हॉरर नाही, लव्ह स्टोरी नाही तर एक निन्जा इपिक आहे.’’

‘First Look’ of Imtiaz Ali’s film, allegedly called The Ring. Not a horror film nor a love story…it’s a Ninja epic! pic.twitter.com/IHWHgdr6W0

— Shah Rukh Khan (@iamsrk) October 11, 2016}}}} ">http://}}}} ">‘First Look’ of Imtiaz Ali’s film, allegedly called The Ring. Not a horror film nor a love story…it’s a Ninja epic! pic.twitter.com/IHWHgdr6W0

— Shah Rukh Khan (@iamsrk) October 11, 2016

यानंतर लगेच शाहरुखने दुसरे टिष्ट्वट करून आधी केलेली पोस्ट हा केवळ विनोद असल्याचे सांगितले. ‘ काही लोक मी केलेली गंमत समजू शकेलेले नाहीत. त्यांच्यासाठी मी हे स्पष्टीकरण देतोय. मी पोस्ट केलेला फोटो  बुडापेस्टच्या थंडीचा आहे,’ असे त्याने लिहिले. आता हा खुलासा करण्याची वेळ शाहरूखवर का आली, ते ठाऊक नाही. पण शाहरूखने खुलासा केलाय, म्हणजे नक्की काही तरी गैरसमज झालायं, एवढेच मात्र नक्की!​

The last tweet about the film is a joke. Clarifying for those who don’t get my drift & end up distorting stuff. It’s just cold in Budapest!

— Shah Rukh Khan (@iamsrk)
October 11, 2016}}}} ">http://}}}} ">The last tweet about the film is a joke. Clarifying for those who don’t get my drift & end up distorting stuff. It’s just cold in Budapest!

The last tweet about the film is a joke. Clarifying for those who don’t get my drift & end up distorting stuff. It’s just cold in Budapest!

— Shah Rukh Khan (@iamsrk)
October 11, 2016}}}} ">— Shah Rukh Khan (@iamsrk) October 11, 2016

 
Web Title: First Look is not a joke!
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.