Finally Sunny Leoni's Navratri special poster advertisement posters deleted! | अखेर सनी लिओनीचे नवरात्र स्पेशल कंडोम जाहिरातीचे पोस्टर्स हटविले!

गेल्या काही दिवसांपासून बॉलिवूडची आयटम गर्ल सनी लिओनीच्या कंडोम जाहिरातीच्या पोस्टर्समुळे गुजरातमधील वडोदरा भागात तणाव निर्माण झाला होता. सनी लिओनी ब्रॅण्ड अ‍ॅम्बेसेडर असलेल्या कंडोम प्रोडक्टची जाहिरात करणारे पोस्टर्स वडोदºयासह अहमदाबाद शहरात जागोजागी लावण्यात आले होते. विशेष म्हणजे या कंडोमच्या जाहिरातीला नवरात्रोत्सवाचा संदर्भ दिला गेल्याने लोकांमध्ये जबरदस्त रोष निर्माण झाला होता. पोस्टरमध्ये सनी लिओनी इंडियन लूकमध्ये बघावयास मिळत होती. दरम्यान, लोकांचा वाढता विरोध लक्षात घेता कंपनीने संपूर्ण शहरातील सनीच्या जाहिरातीचे हे पोस्टर्स अखेर काढले आहेत. 

ALSO READ : गुजरातमध्ये झळकत असलेल्या सनी लिओनीच्या कंडोम जाहिरात पोस्टर्सचा वाद चिघळला!

एमएस युनिव्हर्सिटीचे अतित पटेल यांनी पोस्टरचा एक फोटो सोशल मीडियावर शेअर करीत, याप्रकरणी आवाज उठविला होता. त्यांच्या मते, भलेही या पोस्टरच्या माध्यमातून जनजागृती केली जात असली तरी, त्यावर ज्या पद्धतीने नवरात्रोत्सवाचा संदर्भ जोडण्यात आला आहे, तो पूर्णत: चुकीचा आहे. शिवाय लोकांच्या भावनांना ठेच पोहोचविणारा आहे. अतितच्या या पोस्टनंतर सोशल मीडियावर सनीच्या या जाहिरातीविरोधात एकच जंग पेटली होती. लोकांनी यास कडाडून विरोध करण्यास सुरुवात केली. या अगोदर गोवा राज्यातही सनीच्या या कंडोम जाहिरातीच्या पोस्टर्सना विरोध करण्यात आला होता. गोव्यातील एका राजकीय नेत्याने सनीची ही जाहिरात त्वरित बंद केली जावी, अशी मागणीच केली होती. आता असाच वाद गुजरातमध्ये रंगला आहे. सोशल मीडियावर या जाहिरातीला वाढता विरोध लक्षात घेऊन कंपनीने आता हे पोस्टर्स हटविण्यास सुरुवात केली आहे. दरम्यान पोस्टर्सवर ‘नव रात्रीचा घ्या आनंद’ अशा स्वरूपाचा मजकूर लिहिण्यात आला होता. 

ALSO READ : सनी लिओनीची कंडोमची जाहिरात पुन्हा वादाच्या भोवऱ्यात; आता गोव्यातून झाला विरोध!

सनीच्या वर्कफ्रंटविषयी सांगायचे झाल्यास सनी नुकतीच ‘बादशाहो’ या चित्रपटात इमरान हाशमीसोबत आयटम नंबर करताना बघावयास मिळाली. तिचा हा आयटम नंबर चाहत्यांना खूप आवडत आहे. याशिवाय ती ‘भूमी’ या चित्रपटातही आयटम नंबर करताना बघावयास मिळणार आहे. तसेच सलमानचा भाऊ अरबाज खानसोबतही ती ‘तेरा इंतजार’ या चित्रपटात मुख्य भूमिकेत बघावयास मिळणार आहे. 
Web Title: Finally Sunny Leoni's Navratri special poster advertisement posters deleted!
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.