Finally, Salman Khan's 'Dabang 3' talked about the Moini Roy | अखेर सलमान खानच्या 'दबंग ३'बाबत बोलली मौनी रॉय

टीव्ही अभिनेत्री मौनी रॉय अशी अभिनेत्री आहे जी सतत चर्चेत राहत असते काही ना काही कारणाने तिच्या बद्दल नवीन बातम्या येतच राहतात. मौनी रॉय आता लवकरच चित्रपटात पदार्पण करणार आहे. मौनी एकामागून एक चित्रपट साइन करत आहे. अक्षय कुमारच्या 'गोल्ड' चित्रपटातून मौनी बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. त्यानंतर ती रणबीर कपूर आणि आलिया भट च्या ब्रह्मस्त्र चित्रपटात दिसणार आहे.

काहि दिवसांपूर्वी अशी बातमी होती की मौनीला सलमान खानच्या 'दबंग ३'ची ऑफर आली आहे हे ऐकून मौनीचे चाहते खुश झाले पण आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो की ही बातमी साफ खोटी आहे मौनीने ही गोष्ट केवळ अफवा असल्याचे फॅशन शो दरम्यान सांगितले. मौनीने मीडियाला सांगितले की, हे चांगलेच आहे की मी इथे आहे 'दबंग ३'मध्ये नाही. 
काही दिवसांपूर्वी एका वृत्तपत्रात अशी बातमी आली होती की मौनी 'दबंग ३'मध्ये कॅमियो करताना दिसणार आहे. ती फक्त चित्रपटात 15 ते 20 मिनिटांसाठी असणार आहे. सूत्रांच्या माहितीनुसार चित्रपटात सलमानच्या दोन अभिनेत्री असणार आहेत. दोघींच्या भूमिका छोट्या-छोट्या असणार आहेत. मौनी यात फक्त स्पेशल अपीरेंस करणार आहे. अशी माहिती मिळाली होती की मौनी चुलबुल पांडेच्या जुन्या प्रेमिकेच्या भूमिकेत दिसेल. जी फक्त फ्लैशबॅकच्या सीन्समध्ये दिसणार आहे  आणि सोनाक्षी सिन्हा चित्रपटात रज्जोच्या भूमिकेत दिसेल.   

मौनीने ‘क्योंकी साँस भी बहु थी’ या मालिकेपासून टीव्ही करिअरला सुरूवात केली होती.त्यानंतर ‘जरा नच के दिखा’मध्ये कंटेस्टंट म्हणून सहभागी झाली होती. ‘देवों के देव महादेव’, ‘बिग बॉस 8’अशा अनेक शोमधून मौनीने स्वत:ची छाप पाडली होती. त्या सगळ्या भूमिकांमुळेच आज मौनीला छोटा पडदा ते रूपेरी पडदा हा पल्ला गाठणे शक्य झाले आहे. 
Web Title: Finally, Salman Khan's 'Dabang 3' talked about the Moini Roy
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.