Finally, Preity Zinta returned again | ​अखेर प्रिती झिंटा पुन्हा परतली सेटस्वर

एकेकाळी आघाडीची अभिनेत्री म्हणून गणली जाणारी ‘डिंपल गर्ल’ प्रिती झिंटा अनेक वर्ष झाले रुपेरी पडद्यापासून दूर आहे. लग्न झाल्यानंतर ती पुनरागमन करेल की नाही याविषयीदेखील चर्चा केली केली जात होती.

सर्व तर्कवितर्कांना थांबवत लवकरच ती ‘भैयाजी सुपरहीट’ नावाच्या चित्रपटात आपल्याला दिसणार आहे. या चित्रपटाची शुटींग नुकतीच मुंबईच्या एका स्टुडियोमध्ये सुरू झाली असून प्रितीने फेसबुकवर सेटवरील फोटो शेअर करून याची माहिती दिली.

या फोटोज्मध्ये ती सिनेमातील सहकलाकार अमिषा पटेल, सनी देओल यांच्यासोबत सीनविषयी चर्चा करताना दिसत आहे. कॅप्शनमध्ये तिने लिहिले, सनी, अमिषा व नीरजसोबत खूप धमाल केली.सुमारे चार वर्षांपूर्वी २०१२ मध्ये ‘भैयाजी सुपरहीट’ या चित्रपटाची घोषणा करण्यात आली होती. मात्र काही ना काही कारणास्तव या सिनेमाला उशिर होत राहिला. आता नवीन निर्मात्यासोबत शुटींग उत्साहात सुरू असून लवकरच प्रदर्शनाची तारीख घोषित करण्यात येणार आहे. ‘राईट या राँग’ फे म नीरज पाठक चित्रपटाचा दिग्दर्शक आहे.
Web Title: Finally, Preity Zinta returned again
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.