FILMFARE AWARD CONTROVERSY: Harshvardhan Kapoor's Diljit Dosanjh on Flame | FILMFARE AWARD CONTROVERSY: अवॉर्ड न मिळाल्यामुळे हर्षवर्धन कपूरचा दिलजीत दोसांझवर तळतळाट

गेल्या वर्षी मोठ्या तामझामामध्ये अनिल कपूरचा मुलगा हर्षवर्धनचे ‘मिर्झिया’मधून बॉलीवूड पदार्पण झाले. राकेश ओमप्रकाश मेहरा दिग्दर्शित या चित्रपटाची जेवढी प्रदर्शनापूर्वी चर्चा झाली तेवढा तो बॉक्स आॅफिसवर कमाल दाखवू शकला नाही. तरीदेखील दोन पुरस्कार सोहळ्यांमध्ये हर्षवर्धन सर्वोत्कृष्ट नावोदित अभिनेता ठरला. मात्र एवढ्यावर त्याचे समाधान झाले नाही.

नुक तेच पार पडलेल्या फिल्मफेअर अवॉर्ड्सकडून त्याला खूप अपेक्षा होत्या. बेस्ट अ‍ॅक्टर डेब्यू आपल्यालाच मिळणार याची त्याला खात्री होती. परंतु वास्तवात या पुरस्कारावर बाजी मारली ती ‘उडता पंंजाब’ अ‍ॅक्टर दिलजीत दोसांझने. त्यामुळे नाराज झालेल्या हर्षवर्धनने मनाचा मोठेपणा न दाखवता दिलजीतच्या निवडीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत.

बहिण सोनम कपूरप्रमाणेच त्याने फटकळपणे म्हटले की, ‘नवोदित अभिनेत्याचा पुरस्कार हा प्रथमच चित्रपटात काम करणाऱ्या अभिनेत्याला देण्यात येत असतो. एखाद्या अ‍ॅक्टरने इतर भाषांमध्ये काम केलेले असेल आणि तो केवळ हिंदीमध्ये पहिला चित्रपट करत असेल तर तो नवोदित कसा ठरू शकतो?’

ALSO READ: अमाल मलिकने काढली हिंदी अवॉर्ड्सची औकात!

त्याचा थेट रोख दिलजीत दोसांझवर होता. ‘उडता पंजाब’ जरी दिलजीतचा पहिला हिंदी चित्रपट असला तरी त्याने यापूर्वी अनेक पंजाबी चित्रपटांतून काम केलेले आहे. त्यामध्ये ‘जट अँड ज्युलियट’सारख्या सुपरहिट सिनेमाचा समावेश आहे. त्यामुळे त्याला बेस्ट अ‍ॅक्टर डेब्यू अवॉर्ड देण्यावरून हर्षवर्धनने टीका केली आहे.

त्याचा मुद्दा आणखी भक्कमपणे मांडताना तो म्हणाला की, ‘समजा लिओनार्दो डिकॅप्रियोने जर हिंदी चित्रपटात काम केले तर तो काय त्याचा अभिनयातील डेब्यू ठरणार आहे का? कारण त्याने अनेक हॉलीवूड चित्रपटांत काम केलेले आहे.’ यावरून तर स्पष्ट दिसतेय की, पुरस्कार न मिळाल्याचे दु:ख हर्षवर्धनला इतक्या सहजासहजी पचवणे शक्य झाले नाही.

ALSO READ: फिल्मफेअर अवॉर्ड 2017 : ‘दंगल’चीच बाजी

सध्या तो विक्रमादित्य मोटवाणे दिग्दर्शित ‘भावेश जोशी’ या चित्रपटाच्या शूटींगमध्ये व्यस्त आहे. याबाबत तो म्हणतो, ‘या चित्रपटाविषयी मी फार उत्साहित आहे. अत्यंत वेगळ्या पद्धतीचा विषय यामध्ये हाताळण्यात आला आहे. या व्यतिरिक्त एका बायोपिक सिनेमावरसुद्धा मी लवकरच काम सुरू करणार आहे.’ आॅलिम्पिक गोल्ड मेडल विजेता नेमबाज अभिनव बिंद्राच्या जीवनावर आधारित या बायोपिकमध्ये हर्षवर्धन प्रमुख भूमिकेत आहे.
Web Title: FILMFARE AWARD CONTROVERSY: Harshvardhan Kapoor's Diljit Dosanjh on Flame
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.