In the film Saajan, Madhuri Dixit and Sanjay Dutt will be seen in the main role | ​साजन या चित्रपटात माधुरी दीक्षित आणि संजय दत्त नव्हे तर हे कलाकार दिसणार होते मुख्य भूमिकेत

संजय दत्त, माधुरी दीक्षित आणि सलमान खानची मुख्य भूमिका असलेला साजन हा चित्रपट चांगलाच गाजला होता. या चित्रपटाची कथा, या चित्रपटातील सगळीच गाणी प्रेक्षकांना भावली होती. या चित्रपटातील संजय दत्त आणि माधुरीची जोडी तर प्रेक्षकांना खूपच आवडली होती. आज या चित्रपटाला इतकी वर्षं झाली असली तरी या चित्रपटाची लोकप्रियता थोडीदेखील कमी झालेली नाही. या चित्रपटाने संजय दत्त, माधुरी दीक्षित आणि सलमान खानला प्रचंड लोकप्रियता मिळवून दिली. या चित्रपटात कादर खान, रिमा लागू, लक्ष्मीकांत बेर्डे यांच्यादेखील महत्त्वाच्या भूमिका होत्या. पण तुम्हाला माहीत आहे का, या चित्रपटात संजय दत्त आणि माधुरी दीक्षित यांच्याऐवजी एक दुसरी जोडी प्रेक्षकांना पाहायला मिळणार होती. पण ऐनवेळी या कलाकारांनी चित्रपटासाठी नकार दिल्याने या चित्रपटात संजय आणि माधुरी यांची वर्णी लागली. 
आयशा जुल्का आणि आमिर खान यांची जोडी प्रेक्षकांना साजन या चित्रपटात पाहायला मिळणार होती. आमिरला या चित्रपटासाठी विचारण्यात देखील आले होते. पण आमिरने या चित्रपटात काम करण्यास नकार दिल्याने या चित्रपटासाठी संजय दत्तचा विचार करण्यात आला आणि संजय दत्तला देखील या चित्रपटाची कथा आवडली असल्याने त्याने या चित्रपटात काम करण्यास होकार दिला. या चित्रपटात आयशा जुल्का संजय दत्तची नायिका असणार यावर शिक्कामोर्तब झालेले होते. काहीच दिवसांत आयशा चित्रपटाच्या चित्रीकरणाला देखील सुरुवात करणार होती. पण या चित्रपटाच्या चित्रीकरण्याच्या काहीच दिवस आधी आयशा आजारी पडली आणि तिच्या जागी या चित्रपटात माधुरी दीक्षितला घेण्याचे ठरले. त्यामुळे प्रेक्षकांना या चित्रपटात आयशा जुल्का आणि आमिर खानची जोडी पाहायला मिळाली नाही.
आयशा आणि आमिरची जोडी साजन या चित्रपटात प्रेक्षकांना पाहायला मिळाली नसली तरी हा चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर वर्षभरातच प्रेक्षकांना जो जिता वही सिकंदर हा चित्रपट पाहायला मिळाला. या चित्रपटातील त्यांच्या जोडीला प्रेक्षकांनी अक्षरशः डोक्यावर घेतले होते. या चित्रपटातील अनेक गाणी गाजली होती. 

aamir khan ayesha jhulka

Also Read : अनिल कपूरने त्याच्या पत्नीला माधुरी या नावाने हाक मारल्यानंतर काय होती तिची प्रतिक्रिया
Web Title: In the film Saajan, Madhuri Dixit and Sanjay Dutt will be seen in the main role
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.