पिहू या चित्रपटाचा या कारणामुळे होऊ शकतो गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये समावेश

By ऑनलाइन लोकमत | Published: October 29, 2018 03:03 PM2018-10-29T15:03:58+5:302018-10-29T15:04:27+5:30

पिहू या चित्रपटाच्या ट्रेलरला प्रेक्षकांनी मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद दिला असून आजवर 50 लाखांहून अधिक लोकांनी हा ट्रेलर पाहिला आहे. आता या चित्रपटाचा गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये समावेश होण्याची शक्यता आहे.

Film Based On True Events 'Pihu' To Go For Guiness Book Of World Records? | पिहू या चित्रपटाचा या कारणामुळे होऊ शकतो गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये समावेश

पिहू या चित्रपटाचा या कारणामुळे होऊ शकतो गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये समावेश

googlenewsNext

पिहू या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित होऊन काहीच दिवस झाले असले तरी सध्या याच ट्रेलरची सगळीकडे चर्चा आहे. या चित्रपटाच्या ट्रेलरला प्रेक्षकांनी मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद दिला असून आजवर 50 लाखांहून अधिक लोकांनी हा ट्रेलर पाहिला आहे. आता या चित्रपटाचा गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये समावेश होण्याची शक्यता आहे. कारण या चित्रपटाची कथा ही दोन वर्षांच्या मुलीच्या अवतीभवती फिरणारी आहे. हीच मुलगी या चित्रपटातील मुख्य व्यक्तिरेखा आहे. कोणत्याही दोन वर्षांच्या चिमुकलीने मुख्य भूमिका साकारण्याची ही पहिलीच वेळ असल्याचे म्हटले जात असल्याने पिहू या चित्रपटाच्या निर्मात्यांनी गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डसाठी विचारणा केली आहे. 

पिहू या चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये केवळ एक छोटीशी मुलगी आपल्याला दिसली होती. आपल्या आईच्या मृत्यूनंतर एक दोन वर्षांची चिमुकली काय काय करू शकते, कोणत्या परिस्थितीतून जाईल याचा विचार करणे देखील अवघड आहे. पण हीच परिस्थिती आपल्याला पिहू या चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये पाहायला मिळाली होती. पिहू या चित्रपटाच्या दोन मिनिटांच्या ट्रेलरमध्ये एक लहान मुलगी मोबाईलसोबत खेळताना, टिव्हीवर नृत्य पाहून नाचताना दिसली होती. तसेच खेळत खेळत ती फ्रिजमध्ये देखील जाऊन बसते असे देखील पाहायला मिळाले होते. तिची आई बेडवर झोपलेली असून तिला उठवायचा ती प्रयत्न करत आहे. फोन घेऊन कोणाशी तरी संपर्क साधण्याचा प्रयत्न करत आहे. भूक लागल्यानंतर दूध पिण्यासाठी ही चिमुरडी धडपडत आहे. कधी गॅस पेटवताना तर कधी मायक्रोव्हेव्हमध्ये काही तरी गरम करताना ती दिसत आहे. आपल्या आईचे निधन झाले असल्याची या मुलीला थोडीदेखील कल्पना नाहीये. आपल्या आईला सतत हाक देणारी चिमुकली, तिच्या पुढ्यात जाऊन झोपणारी चिमुकली ही पिहूच्या ट्रेलरमधील दृश्यं पाहून अंगावर नक्कीच काटा उभा राहातो.

पिहू हा चित्रपट सत्य घटनेवर आधारित असून या चित्रपटाचे दिग्दर्शन ज्येष्ठ पत्रकार विनोद काप्री यांनी केले आहे. तसेच रोनी स्क्रूवाला आणि सिद्धार्थ रॉय कपूरने या चित्रपटाची निर्मिती केली आहे. मायरा विश्वकर्माने यात पिहू ही मुख्य भूमिका साकारली आहे. हा चित्रपट 16 नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.

Web Title: Film Based On True Events 'Pihu' To Go For Guiness Book Of World Records?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.