'ठग्स ऑफ हिंदोस्तान'मध्ये फातिमा सना शेख दिसणार 'ह्या' भूमिकेत

By ऑनलाइन लोकमत | Published: September 20, 2018 05:28 PM2018-09-20T17:28:32+5:302018-09-20T17:31:03+5:30

बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट आमीर खानचा आगामी बहुचर्चित चित्रपट 'ठग्स ऑफ हिंदोस्तान'ची प्रेक्षक उत्सुकतेने वाट पाहत आहेत. या चित्रपटाच्या निमित्ताने अमिताभ बच्चन व आमीर खान पहिल्यांदाच एकत्र रुपेरी पडद्यावर झळकणार आहेत.

Fatima Sana Shaikh will be play this role in 'Thugs Of Hindustan' | 'ठग्स ऑफ हिंदोस्तान'मध्ये फातिमा सना शेख दिसणार 'ह्या' भूमिकेत

'ठग्स ऑफ हिंदोस्तान'मध्ये फातिमा सना शेख दिसणार 'ह्या' भूमिकेत

googlenewsNext
ठळक मुद्दे 'ठग्स ऑफ हिंदोस्तान'मध्ये फातिमा साकारणार जाफिराची भूमिका

बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट आमीर खानचा आगामी बहुचर्चित चित्रपट 'ठग्स ऑफ हिंदोस्तान'ची प्रेक्षक उत्सुकतेने वाट पाहत आहेत. हा यशराज फिल्म्स बॅनरअंतर्गत प्रदर्शित होणारा या वर्षीचा सर्वांत मोठा चित्रपट ठरणार आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने अमिताभ बच्चन व आमीर खान पहिल्यांदाच एकत्र रुपेरी पडद्यावर झळकणार आहेत. दिवाळीच्या मुहूर्तावर प्रदर्शित होणाऱ्या 'ठग्स ऑफ हिंदोस्तान'मधील आणखी एका व्यक्तिरेखेबद्दल सांगण्यात आले आहे. ही व्यक्तिरेखा म्हणजे जाफिरा. या भूमिकेत दिसणार आहे दंगल फेम फातिमा सना शेख. फातिमाचा या चित्रपटातील लूक प्रदर्शित करण्यात आला आहे.

फातिमा एका धाडसी योद्धाच्या पोशाखात पाहायला मिळत आहे. 'इसके निशाने से बचके रहो' आमीरने या मोशन पोस्टरला दिले आहे. या चित्रपटातील भूमिका एकेक करून प्रेक्षकांसमोर आणल्या जात आहेत. याआधी अमिताभ बच्चन यांचा लूक प्रदर्शित झाला होता. उत्साही आणि तेजस्वी अशी जाफिरा तिरंदाजीत तरबेज असते.



 

रोमांच आणि अॅक्शनने परिपूर्ण अशा या चित्रपटाची प्रेक्षकांमध्ये फारच उत्सुकता आहे. अमिताभ बच्चन, फातिमानंतर आता आमीर खान आणि कतरिना कैफ यांचा लूक पाहण्यासाठी चाहते उत्सुक आहेत. 'ठग्स ऑफ हिंदोस्तान' हा चित्रपट फिलिप मेडोस टेलर यांच्या ‘कन्फेशन्स ऑफ अ ठग अँड द कल्ट ऑफ द ठगी’ या कादंबरीवर आधारित आहे. येत्या ८ नोव्हेंबर रोजी हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

Web Title: Fatima Sana Shaikh will be play this role in 'Thugs Of Hindustan'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.