आज फादर्स डे, अर्थात पितृदिऩ मातृदिनाप्रमाणेच आजचा हा पितृदिनही जगभर साजरा केला जातो. आजच्या या खास दिवसानिमित्त बॉलिवूड सेलिब्रिटींच्या वडिलांबद्दल आपण जाणून घेऊ यात. बॉलिवूडच्या अनेक स्टार्सचीही आपल्या वडिलांसोबत छान केमिस्ट्री आहे. कारण आपले डॅड जगाच्या पाठीवर सगळ्यात सुपर कुल डॅड आहेत,असे या स्टार्सचे म्हणणे आहे आणि त्यात खोटे काहीच नाही. आज अशाच काही बॉलिवूड स्टार्सच्या सुपर डुपर कूल डॅडबद्दल आम्ही तुम्हाला सांगणार आहोत...

अमिताभ बच्चनबिग बी अमिताभ बच्चन कायम आपल्या मुलांना प्रेरणा, प्रोत्साहन देताना दिसतात. अमिताभ एक असे पिता आहेत, जे मुलांसोबत मुलं होतात. पडद्यावर अमिताभ यांनी अनेक चित्रपटात वडिलांची भूमिका साकारली. रिअल लाईफमध्येही अभिषेक आणि श्वेता या दोघांसाठी जगाच्या पाठीवरचे सर्वाधिक कूल डॅड आहेत.

धर्मेन्द्रधर्मेन्द्र हे सहा मुलांचे पिता आहेत. या सहाही मुलांवर त्यांचे जीवापाड प्रेम आहे. आपल्या सर्व मुलांना ते वेळोवेळी सपोर्ट करताना दिसतात. बॉबी देओल, सनी देओल,विजेता देओल आणि अजीता देओल यांच्यासोबतची त्यांची केमिस्ट्री एकदम कूल आहे. याशिवाय अहाना देओल आणि ईशा देओल यांच्यासोबतही त्यांचे प्रेमळ नाते आहे.

ऋषी कपूरऋषी कपूर बाहेरून अतिशय रागीट, मुलांची तोंडावर कधीही स्तूती न करणारे वडिल वाटतं असले तरी प्रत्यक्षात आपल्या मुलांप्रति ते कमालीचे प्रोटेक्टिव्ह व कूल आहेत. आपल्या मुलांबद्दल ते कधीच चुकीचे काही ऐकू शकत नाहीत. मुलगा रणबीर कपूरच्या बद्दल कुणी काही बोललं की, ते लगेच संतापतात.

अनिल कपूरअनिल कपूर याचे आपल्य तिन्ही मुलांसोबत म्हणजे, रिया, सोनम, हर्षवर्धन यांच्यासोबत मित्रत्वाचे नाते आहे. मुलांच्या निर्णयाचा त्यांनी कायम आदर केला आहे.

जितेन्द्रबॉलिवूडचे आणखी एक कूल डॅड म्हणजे, जितेन्द्र.  दोन्ही मुले म्हणजे मुलगी एकता कपूर आणि मुलगा तूषार कपूर यांच्यासाठी जितेन्द्र एका आधारवडापेक्षा कमी नाहीत. जितेन्द्र यांनी आपल्या दोन्ही मुलांना मनाजोगे स्वातंत्र्य दिले. त्यांच्या निर्णयाचा कायम आदर केला आहे.


सलीम खानसलमान खानचे वडील सलीम खान प्रसिद्ध लेखक आहेत. सलमान खान, अरबाज खान, सोहेल खान, अलविरा खान आणि अर्पिता खान या सर्वांचे डॅड सलीम खान म्हणजे, एक कूल व्यक्तिमत्त्व. सलीम आपल्या मुलांच्या पाठीशी कायम खंबीरपणे उभे दिसतात. सलमान खानच्या कोर्टाच्या प्रकरणात आपण हे अनेकदा अनुभवले आहेच.

  रणधीर कपूररणधीर कपूर यांचे आपल्या दोन्ही मुली करिश्मा व करिना यांच्यावर जीवापाड प्रेम आहे. करिश्मा व करिना यांना रणधीर यांनी मुलांसारखे वाढवले. त्यांच्या निर्णयाचा त्यांनी कायम सन्मान केला. करिश्मा करिनासाठी डॅड रणधीर सर्वाधिक कूल डॅड आहेत.

Web Title: Fathers Day 2018: This is Bollywood Super Dopper Cool Dad !!
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.