Fat To Fit: This Bollywood director reduced the weight by taking medicine | Fat To Fit: बॉलिवूडच्या या दिग्दर्शकाने औषध घेऊन कमी केले वजन

बॉलिवूडमध्ये आपल्या फिट दिसण्यासाठी,सिक्स पॅक,पिळदार बॉडी कमावण्यासाठी काय करतील याचा नेम नाही.तसेच वजन जास्त असणेही धोक्याचे.त्यामुळे वजन कमी होण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे डाएट प्लॅन, तसेच तासन तास जिममध्ये वर्कआऊट करताना कलाकार मंडळी दिसतात.या इंडस्ट्रीत अनेक कलाकारांनी आपले वजन कमी करत एक वेगळेच रूप मिळवले आहे.असे  अनेक सेलिब्रेटी आहेत जे अगोदर खूप लठ्ठ होते.विशेष म्हणजे लठ्ठ असूनही त्यांनी आपली वेगळी ओळख निर्माण केली,मात्र आता त्यांनी खूप मेहनत करुन फॅट टू फिट अशी ओळख निर्माण केली आहे.यांच्यात प्रसिद्ध कोरियोग्राफर गणेश आचार्य, सिंगर अदनान सामी यासारखी अनेक कलाकार आहेत ज्यांनी  हेल्दी डायट आणि कठीण वर्कआउट करुन आपले  वजन कमी केले आहे. बिझी शेड्युलमुळे जिममध्ये जाऊन वर्कआऊट करणं शक्य नाही.त्यामुळं दिग्दर्शक सतीश कौशिक यांनी मात्र 
जिम वर्कआऊट या गोष्टीपेक्षा एका वेगळ्याच गोष्टीला प्राधान्य दिल्याचे समोर आले आहे या कारणामुळेच सतीश कौशिक यांनी त्यांचे वाढते वजन आटोक्यात आणले आहे.सतीश कौशिक यांनी चार-पाच किलो नाही तर तब्बल २५ किलो वजन कमी केले आहे. वजन कमी केल्यानंतरचे सतीश यांचे लूक सगळ्यांना अवाक् करणारे आहे. या लूकमध्ये ते चांगलेच हॅण्डसम दिसत आहेत.डॉक्टरांशिवाय माझे मित्र, अनिल कपूर, निर्माता गुनीत मोंगा यांनीही  वजन कमी करण्यासाठी प्रोत्साहन दिले. मिडीया रिपोर्टनुसार सतीश वजन कमी करण्यासाठी ते अमेरिकेचे डॉक्टर क्रिश्यिन मिडिल्टनला भेटले. मिडिल्टनने त्यांना मेडिसिन घेण्याचा सल्ला दिला.रोज सात तासांच्या अंतराने त्यांनी औषधांचे 7 ड्रॉप घेतले.हे औषध त्यांनी जवळपास 40-42 दिवस घेतले.यानंतर चार-पाच आठवडे आवडते जेवण केले त्यानंतर 40-42 दिवस औषधे घेतली.सतीश यांनी असे तीन प्रोग्राम केले आहेत.आता चौथा प्रोग्राम करत आहेत अशी माहिती दिली आहे.लवकरच  सतीश कौशिक 'वीरे की वेडिंग', 'सूरमा', 'नमस्ते इंग्लैंड', 'यमला पगला दीवाना 3' सारख्या  आणखी काही सिनेमात झळकणार आहेत.'तेरे नाम' च्या सीक्वलवरही ते काम करणार असल्याचीही चर्चा सध्या रंगत आहेत.
Web Title: Fat To Fit: This Bollywood director reduced the weight by taking medicine
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.