फरहार अख्तरने शेअर केला गर्लफ्रेंट शिबानीचा फोटो, फॅन्सनी दिली अशी काही रिअॅक्शन

By ऑनलाइन लोकमत | Published: April 19, 2019 12:02 PM2019-04-19T12:02:20+5:302019-04-19T12:08:16+5:30

फरहान अख्तर आणि शिबानी दांडेकर यांचे प्रेम कुणापासून लपून राहिलेले नाही. दोघे सतत व्हेकेशन, पार्टी आणि इव्हेंटसला एकत्र दिसतात.

Farhan akhtar share girlfriend shibani dandekar this special photo | फरहार अख्तरने शेअर केला गर्लफ्रेंट शिबानीचा फोटो, फॅन्सनी दिली अशी काही रिअॅक्शन

फरहार अख्तरने शेअर केला गर्लफ्रेंट शिबानीचा फोटो, फॅन्सनी दिली अशी काही रिअॅक्शन

googlenewsNext
ठळक मुद्देसोशल मीडियावर दोघे एकमेंकावर सतत प्रेमाचा वर्षाव करत असतातशिबानी व फरहान दोघांच्याही बोटांत एकाच स्टाईलची अंगठी दिसली होती

फरहान अख्तर आणि शिबानी दांडेकर यांचे प्रेम कुणापासून लपून राहिलेले नाही. दोघे सतत व्हेकेशन , पार्टी आणि इव्हेंटसला एकत्र दिसतात. सोशल मीडियावर दोघे एकमेंकावर सतत प्रेमाचा वर्षाव करत असतात. नुकताच फरहानने शिबानीचा एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. या फोटोत शिबानी तिच्या डॉगसोबत दिसतेय. फॅन्सना शिबानीतचा हा फोटो खूपच आवडला आहे. दोघे सतत एकमेकांचे फोटो सोशल मीडियावर शेअर करताना दिसतात. 


 फरहान व शिबानीने आपल्या नात्याला नाव देण्याचा निर्णय घेतला आहे आणि त्यानुसार, लवकरच हे कपल विवाहबंधनात अडकणार आहे. खुद्द फरहानने हा खुलासा केला होता. अलीकडे फरहानने त्याच्या सोशल अकाऊंटवर एक फोटो शेअर केला होता. या फोटोत शिबानी व फरहान दोघांच्याही बोटांत एकाच स्टाईलची अंगठी दिसली होती. या फोटोवरून दोघांनीही साखरपुडा केल्याचे मानले जात आहे.


फरहान घटस्फोटीत आहे. २०१७ साली त्याने पत्नी अधुनाशी घटस्फोट घेतला. या जोडप्याला दोन मुलं आहेत. गेल्या वर्षीच्या सप्टेंबरपासून फरहान आणि शिबानीच्या रोमांन्सची चर्चा सुरु झाली होती. फरहान-शिबानी अगदी ‘खुल्लम खुल्ला’ गळ्यात गळा घालून हिंडू फिरू लागलेत. 


वर्कफ्रंटबाबत बोलायचे झाले तर  फरहान ‘द स्काज इज पिंक’या सिनेमात दिसणार आहे.  सोनाली बोस दिग्दर्शित या सिनेमात प्रियांका चोप्रा आणि झायरा वसीम मुख्य भूमिकेत आहेत. 

Web Title: Farhan akhtar share girlfriend shibani dandekar this special photo

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.