Fardeen Khan's first photo of Tanahuli! Specially for you !! | ​फरदीन खानच्या तान्हुल्याचा पहिला फोटो! खास तुमच्यासाठी!!

अभिनेता फरदीन खान दुस-यांदा बाप झाला. कालच आम्ही तुम्हाला ही गोड बातमी दिली. आणि आज? आज आम्ही तुमच्यासाठी फरदीनच्या या गोंडस बाळाचा पहिला फोटो घेऊन आलो आहोत. होय, फरदीनने आपल्या मुलाचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. या फोटोत फरदीनने बाळाला हातावर घेतले आहे. आपल्या बाळाकडे कौतुकाने पाहणारा फरदीन यात दिसतोय. या फोटोसोबत फरदीने शुभेच्छा देणा-यांचे आभार मानले आहेत.
फरदीन आणि त्याची पत्नी नाताशा यांना पहिली मुलगी आहे. गत ११ आॅगस्टला  नताशा व फरदीन यांना पुत्ररत्नाचा लाभ झाला.   या गोड बातमीमुळे सध्या दोन्ही कुटुंबामध्ये आनंदाचे वातावरण आहे. गेल्या काही महिन्यांपासू  पत्नी नताशा लंडनमध्ये होती. बाळाला लंडनमध्ये जन्म द्यायचा निर्णय त्यांनी घेतला होता. बाळाचे नाव अजरीउस फरदीन खान ठेवण्यात आले आहे.
 


फरदीनने अभिनेत्री मुमताज यांची कन्या नताशा हिच्यासोबत २००५मध्ये प्रेमविवाह केला आहे.१२ वर्षांपूर्वी मुंबईत शाही थाटात त्यांचा विवाहसोहळा पार पडला होता. त्यांच्या लग्नात बॉलिवूडमधली अनेक कलाकारांनी हजेरी लावली होती. फरदीन आणि नताशाच्या तीन वर्षांच्या मुलीचे नाव डियानी इसाबेल खान आहे.अलीकडच्या काळात फरदीन बॉलिवूडमध्ये दिसलेला नाही. एकेकाळी बॉलिवूडचा सगळ्यात स्मार्ट अ‍ॅक्टर म्हणून तो ओळखला जायचा. पण काही चित्रपटानंतर करिअरला उतरली कळा लागली ना लागली तसा फरदीन मोठ्या पडद्यापासून दूर झाला. काही दिवसांपूर्वी अचानक तो चर्चेत आला. वाढलेल्या वजनातील त्याचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल झालेत. गोलमटोल फरदीनचे हे फोटो पाहून अनेकांना आश्चर्य वाटले. यानंतर फरदीन सलमान खानसोबत ‘नो एन्ट्री’च्या सीक्वलमध्ये दिसणार, अशी बातमी आली. यात फरदीन महत्त्वपूर्ण भूमिकेत दिसणार असल्याचेही ऐकवात आले. अर्थात याबाबत अद्यापही अधिकृत घोषणा झालेली नाही.
 
Web Title: Fardeen Khan's first photo of Tanahuli! Specially for you !!
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.