फराह खानचा ‘लकी’ शर्ट ठरणार का भावासाठी ‘लकी’?

By ऑनलाइन लोकमत | Published: July 15, 2018 11:01 AM2018-07-15T11:01:10+5:302018-07-15T11:07:31+5:30

फराह खान आपल्या नव्या प्रोजेक्टमध्ये बिझी आहे. हा नवा प्रोजेक्ट कुठला तर ‘हाऊसफुल4’. सुपरहिट कॉमेडी फ्रेंचाईजी ‘हाऊसफुल’चा हा चौथा चित्रपट फराहचा भाऊ साजिद खान दिग्दर्शित करतो आहे.

farah khan chooses her lucky shirt for housefull 4 song | फराह खानचा ‘लकी’ शर्ट ठरणार का भावासाठी ‘लकी’?

फराह खानचा ‘लकी’ शर्ट ठरणार का भावासाठी ‘लकी’?

googlenewsNext

फराह खान आपल्या नव्या प्रोजेक्टमध्ये बिझी आहे. हा नवा प्रोजेक्ट कुठला तर ‘हाऊसफुल4’. सुपरहिट कॉमेडी फ्रेंचाईजी ‘हाऊसफुल’चा हा चौथा चित्रपट फराहचा भाऊ साजिद खान दिग्दर्शित करतो आहे आणि फराह यातील गाणी कोरिओग्राफर करते आहे. यातील गाण्यांची रिहर्सल्स सुरू झाली आहे आणि यादरम्यानचे काही फोटोही समोर आले आहेत. या फोटोत फराह ‘हाऊसफुल4’च्या तिन्ही नट्या क्रिती सॅनन, कृति खरबंदा आणि पूजा हेगडे यांच्यासोबत दिसून आली. या फोटोतील मजेशीर गोष्ट म्हणजे, यात फराह पुन्हा त्याच शर्टमध्ये दिसली, जो तिने ‘धडक’ आणि ‘वीरे दी वेडींग’च्या गाण्यांच्या शूटवेळी घातला होता.

 होय, ‘वीरे दी वेडींग’मधील ‘तारीफां’ हे गाणे फराहनेच कोरिओग्राफ केले होते. हे गाणे सुपरहिट ठरले होते. यातील डान्सिंग स्टेप्सही लोकप्रीय झाल्या होत्या. हे गाणे कोरिओग्राफ करताना फराहने हाच शर्ट घातला होता.

यानंतर ‘धडक’चे ‘झिंगाट’ हे गाणे कोरिओग्राफ करतानाही फराह याच शर्टात दिसली होती. हे गाणे तसे फार लोकप्रीय झाले नाही. पण यातील डान्सिंग स्टेप्सने मात्र अनेकांचे लक्ष वेधून घेतले होते. आता फराह ‘हाऊसफुल4’चे गाणे कोरिओग्राफ करतेय. तेही त्याच सेम शर्टमध्ये. आता केवळ फराहचा हा लकी शर्ट तिचा भाऊ साजिद खान याच्यासाठी किती लकी ठरतो, तेच तेवढे बघायचेय.

‘हाऊसफुल4’ हा चित्रपट बॉलिवूडमधील सर्वात महागडा चित्रपट असणार आहे. चित्रपटाचे बजेट दोनशे कोटी रुपये असल्याचे बोलले जात आहे. चित्रपटासाठी हॉलिवूड येथून वीएफएक्स टीमलाही बोलावण्यात आले आहे. 'हाउसफुल-4' ची कथा पुनर्जन्मावर आधारित असणार आहे. हा चित्रपट पुढच्या दिवाळीला प्रदर्शित होणार आहे. हाउसफुल- 3’ 2016 मध्ये रिलीज झाली होता. या चित्रपटाने शंभर कोटींपेक्षा अधिक गल्ला जमविला होता. त्यामुळे चौथा भागही प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यात यशस्वी ठरेल, असा निर्मात्यांना ठाम विश्वास आहे. आतापर्यंत या सिरीजचे तीन चित्रपट प्रदर्शित झाले असून, सर्वच सुपरहिट ठरले आहेत.

Web Title: farah khan chooses her lucky shirt for housefull 4 song

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.