पुन्हा पडद्यावर दिसणार ‘ही’ प्रसिद्ध जोडी; ‘वेलकम ३’ आणि ‘वेलकम ४’ येणार प्रेक्षकांच्या भेटीला!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 10, 2019 06:00 PM2019-02-10T18:00:00+5:302019-02-10T18:00:02+5:30

निर्मात्यांनी या चित्रपटाचा तिसरा आणि चौथा भागही काढण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे ‘वेलकम ३’ आणि ‘वेलकम ४’ हे एकापाठोपाठ प्रदर्शित होणार आहे.

A famous pair of 'This' will be seen on the screen again; Welcome to 'Welcome 3' and 'Welcome 4'! | पुन्हा पडद्यावर दिसणार ‘ही’ प्रसिद्ध जोडी; ‘वेलकम ३’ आणि ‘वेलकम ४’ येणार प्रेक्षकांच्या भेटीला!

पुन्हा पडद्यावर दिसणार ‘ही’ प्रसिद्ध जोडी; ‘वेलकम ३’ आणि ‘वेलकम ४’ येणार प्रेक्षकांच्या भेटीला!

googlenewsNext

 ‘वेलकम’ हा रुपेरी पडद्यावरचा सुपरहिट चित्रपट. नाना पाटेकर, अनिल कपूर, अक्षय कुमार, परेश रावल यांच्या अफलातून केमिस्ट्रीमुळे आत्तापर्यंत प्रेक्षकांचे प्रचंड मनोरंजन झाले. नाना पाटेकर-अनिल कपूर यांनी साकारलेली उदय शेट्टी आणि मजनू भाईच्या भूमिकेने प्रेक्षकांना  हसवले होतं. ही जोडी ‘वेलकम २’ मध्येही दिसली होती. मात्र ‘वेकलम’च्या दुसऱ्या  भागाला म्हणावी तितकी प्रसिद्धी लाभली नाही. पण असं असलं तरी निर्मात्यांनी या चित्रपटाचा तिसरा आणि चौथा भागही काढण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे ‘वेलकम ३’ आणि ‘वेलकम ४’ हे एकापाठोपाठ प्रदर्शित होणार आहे.

‘वेलकम ३’ आणि ‘वेलकम ४’ साठी नाना पाटेकर, अनिल कपूर आणि जॉन अब्राहमचं नाव निश्चित करण्यात आलं आहे. ‘वेलकम ३’ २०२० पर्यंत आणि ‘वेलकम ४’ २०२१मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला आणण्याचा प्रयत्न निर्मात्यांचा असणार आहे. ‘वेलकम ३’ मध्ये नाना, जॉन, अनिल हे त्रिकुट दिसणार असून अहमद खान तिसऱ्या  भागाच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळतील’ अशी माहिती सुत्रांकडून मिळाली आहे.

विश्वसनीय सुत्रांकडून कळतेय की, ‘वेलकमचं चित्रीकरण पुढील काही महिन्यात सुरू होईल अशी देखील माहिती समजत आहे. २००७ मध्ये ‘वेलकम’ हा चित्रपट आला होता यात अक्षयसोबत कॅटरिना कैफ, मल्लिका शेरावत प्रमुख भूमिकेत होती तर २०१५ साली आलेल्या वेलकम २ मध्ये जॉन आणि श्रुती हसन प्रमुख भूमिकेत होते.

Web Title: A famous pair of 'This' will be seen on the screen again; Welcome to 'Welcome 3' and 'Welcome 4'!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.