काही दिवसांपूर्वी मुंबईमध्ये फिल्मफेअर ग्लॅमर अ‍ॅन्ड स्टाइल पुरस्कार सोहळा पार पडला. या पुरस्कार सोहळयाला संपूर्ण बॉलिवूडमधील कलाकारांनी चार चाँद लावले. पण हा पुरस्कार सोहळयाकडे लक्ष वेधून घेतले ते काजोलच्या आऊटफीट ड्रेसने. बॉलिवूडच्या या तगडया अभिनेत्रीला तिने परिधान केलेल्या आऊटफीटमुळे त्रासाला सामोरे जावे लागले. त्यामुळे संपूर्ण पुरस्कार सोहळयात तिची चांगलीच फजिती झाली. अशाच काही ड्रेसेसमुळे फजिती झालेल्या बॉलिवूड अभिनेत्रींचा लोकमत सीएनएक्सने घेतलेला आढावा.



काजोल : फिल्मफेअर ग्लॅमर अ‍ॅन्ड स्टाईल पुरस्कार नुकताच मुंबईत पार पाडला. या सोहळयाला ऐश्वर्या रॉय ब्लॅक गाऊनमध्ये खूप सुंदर दिसली. पिंक गाऊनमध्ये कॅटरिनाने रेड कारपेटवर आपला जलवा दाखविला.  काजोल मात्र या आनंद सोहळयात एका त्रासाला सामोरे जाताना दिसली. ते म्हणजे तिने परिधान केलेला ड्रेस. क्रीम कलरच्या आऊटफीटमध्ये काजोल बिलकूल कन्फर्टेबल नव्हती.


 
वाणी कपूर : ब्रेफिके या आगामी चित्रपटामुळे वाणी कपूर ही बरीच चर्चेत आहे. या चित्रपटात ती अभिनेता रणवीर सिंग याच्यासोबत झळकणार आहे. पण या अभिनेत्रीला देखील तिच्या ड्रेसने धोका दिला. एका पुरस्कार कार्यक्रमावेळी तिच्या आऊटफीटचा गळा खूपच खाली आला होता. शेवटी तिला आपला ड्रेसचा हा निसटता गळा सांभाळावा लागला. 



करिना कपूर : बॉलिवूडची ही तगडी अभिनेत्री सध्या प्रेग्नंसीमुळे बरीच चर्चेत आहे. आपल्या सुंदर स्टाईलने प्रेग्नंसीदेखील गाजविते आहे. करिना सातत्याने गर्भावस्थेतही सोशल मिडीयावर अधिक ग्लॅमरस लूकमध्ये दिसतीय. पण तिलाही आपला जलवा दाखविताना त्रास सहन करावा लागला. एका पत्रकार परिषदेत करिनाला आपले स्लीव्हज सांभाळावे लागले होते. संपूर्र्ण पत्रकार परिषदेत त्रस्त झालेली ती पाहायला मिळाली.



प्रियांका चोप्रा : बॉलिवूडसह हॉलीवूडमध्येही प्रियांका चोप्राने आपले अस्तित्व निर्माण केले आहे. मराठीमध्येही ती पदार्पण करण्यास सज्ज झालीय. अशा या सुंदर अभिनेत्रीला एकदाच नाही तर तब्बल दोन वेळा अशा त्रासाला सामोरे जावे लागले.  एका कार्यक्रमावेळी ही अभिनेत्री आपले स्लीव्हज् सांभाळाताना कॅमेरात कैद झाली.



श्रद्धा कपूर :आपल्या प्रत्येक स्टाईलने प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणारी अभिनेत्री श्रद्धा कपूर हिलाही ड्रेसने धोका दिला. भर प्रेक्षकांसमोरच तिला आपला ड्रेस सांभाळावा लागला होता. हा प्रकार तिच्याबद्दल ही दोन वेळा घडला आहे. सध्या तिचा हाफ गलफ्रेंड हा चित्रपट प्रदर्शनासाठी सज्ज झाला आहे. तसेच या चित्रपटाची तरूणांमध्ये देखील अधिक उत्सुकता दिसतेय.
 
 

Web Title: Fajita of Bollywood Actress
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.