The face of the movie is going to hit the shadow | धडक या चित्रपटात झळकणार हा मराठमोळा चेहरा

धडक या चित्रपटाचा ट्रेलर आज लाँच झाला असून या चित्रपटाच्या ट्रेलरची आज सगळीकडे चर्चा आहे. या चित्रपटात जान्हवी कपूर आणि इशान खट्टर मुख्य 
भूमिकेत आहेत. मराठीतील सैराट ह चित्रपट प्रचंड गाजला होता. या चित्रपटातील आर्ची आणि परशाची कैमिस्ट्री प्रेक्षकांना प्रचंड भावली होती. या चित्रपटात रिंकू राजगूरूने आर्ची तर परशाची भूमिका आकाश ठोसरने साकारली होती. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगलीच कमाई केली होती. मराठी चित्रपटांमध्ये या चित्रपटाने आजवर सगळ्यात चांगली कमाई केली होती. या चित्रपटाची गाणी प्रेक्षकांनी अक्षरशः डोक्यावर घेतली होती. त्यामुळेच या चित्रपटाचा रिमेक करण जोहरने हिंदीत केला. या चित्रपटाचा ट्रेलर पाहून ‘सैराट’पेक्षा ‘धडक’चा बाज वेगळा आहे, हे जाणवत आहे. या चित्रपटात एका मराठी अभिनेत्री देखील मुख्य भूमिकेत असल्याचे खूपच कमी जणांना माहीत आहे.
धडक या चित्रपटात मराठमोळी अभिनेत्री ऐश्वर्या नारकर प्रेक्षकांना दिसणार आहे. या चित्रपटात ती मधुकर म्हणजेच इशानच्या आईची भूमिका साकारणार आहे. हा ट्रेलर पाहून श्रीदेवीच्या चाहत्यांना प्रचंड आनंद झाला आहे. श्रीदेवी आज हयात असती तर ती खूप खूश झाली असती असे तिच्या फॅन्सचे म्हणणे आहे तर श्रीदेवीच्या अनेक फॅन्सना हा ट्रेलर पाहून श्रीदेवी आणि जान्हवीमध्ये एक साम्य असल्याचे जाणवले आहे. चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये जान्हवीचा आवाज हा अगदी श्रीदेवीसारखा असल्याचे तिच्या फॅन्सना वाटले आहे. ट्रेलर डोळे मिटून ऐकला तर आपण श्रीदेवीचाच आवाज ऐकत आहे असे वाटत असल्याचे श्रीदेवीच्या अनेक फॅन्सचे म्हणणे आहे. 
धडक हा चित्रपट राजस्थानी पार्श्वभूमीवर आधारित आहे. यात जान्हवी आणि इशान खट्टर दोघेही राजस्थानी टोनमध्ये बोलताना दिसताहेत. ट्रेलरमधील जान्हवी कपूर आणि शाहिद कपूरचा भाऊ इशान खट्टर यांची केमिस्ट्रीही अफलातून आहे. चित्रपटातील अनेक सीन्स ‘सैराट’ची आठवण करून देतात, पण जान्हवी आणि इशान या नव्या कोऱ्या जोडीला पाहणे, एक नवा अनुभव आहे. तुम्हाला ठाऊक आहेच की, जान्हवीचा हा पहिला चित्रपट आहे. पण इशानचा दुसरा सिनेमा आहे. यापूर्वी इशानचा ‘बियॉन्ड द क्लाऊड्स’ रिलीज झाला आहे. या चित्रपटातील इशानच्या भूमिकेला प्रेक्षकांची चांगलीच पसंती मिळाली होती. 

aishwarya narkar


Also Read : धडकचा ट्रेलर पाहून प्रेक्षकांना आठवली श्रीदेवी... श्रीदेवी आणि जान्हवी कपूरमध्ये जाणवले हे साम्य
Web Title: The face of the movie is going to hit the shadow
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.