Exclusive : असा असणार राणी मुखर्जीचा मर्दानी 2 मधील लुक

By ऑनलाइन लोकमत | Published: April 30, 2019 06:00 AM2019-04-30T06:00:00+5:302019-04-30T06:00:05+5:30

मर्दानी या चित्रपटात राणीने शिवानी शिवाजी रॉय ही भूमिका साकारली होती. मानवी तस्करी करणाऱ्या रॅकेटचा शोध घेणाऱ्या या शिवानीच्या प्रेक्षक प्रेमात पडले होते.

Exclusive: Rani dons the cop uniform in Mardaani 2! | Exclusive : असा असणार राणी मुखर्जीचा मर्दानी 2 मधील लुक

Exclusive : असा असणार राणी मुखर्जीचा मर्दानी 2 मधील लुक

googlenewsNext
ठळक मुद्देया चित्रपटात राणी पोलिस अधिक्षकाची भूमिका बजावणार आहे. या चित्रपटात राणीचा लूक कसा असणारा याचा एक्सक्लुझिव्ह फोटो आम्ही तुमच्या भेटीस आणला आहे. राणी चित्रपटात अतिशय बिनधास्त, कोणाला न घाबरणाऱ्या पोलिसाच्या भूमिकेत दिसणार आहे. 

बॉलिवूड इंडस्ट्रीत सध्या हिट सिनेमांचे सीक्वल आणण्याची चढाओढ दिसतेय. यापैकी अनेक सीक्वलही हिट होतात तर काही दणकून आपटतात. पण पोलिस ड्रामा असलेले सीक्वल मात्र कायम हिट ठरले आहेत. सलमान खानची ‘दबंग’ सीरिज असो वा अजय देवगणची ‘सिंघम’ सीरिज याचे एक उत्तम उदाहरण आहे. जेव्हा केव्हा चुलबुल पांडे आणि बाजीराव सिंघम पडद्यावर आलेत, तेव्हा तेव्हा प्रेक्षकांनी त्यांना प्रचंड प्रेम दिले. आता राणी मुखर्जी ही सुद्धा या यादीत आली आहे. बॉलिवूडची गुणी अभिनेत्री राणी मुखर्जीचा ‘मर्दानी’ या चित्रपटाचा सीक्वल लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या चित्रपटात राणीने महिला पोलिस अधिकाऱ्याची भूमिका साकारली होती. मर्दानी 2 मध्ये देखील राणी पोलिसाच्याच भूमिकेत दिसणार आहे. 

मर्दानी या चित्रपटात राणीने शिवानी शिवाजी रॉय ही भूमिका साकारली होती. मानवी तस्करी करणाऱ्या रॅकेटचा शोध घेणाऱ्या या शिवानीच्या प्रेक्षक प्रेमात पडले होते. या चित्रपटाला प्रेक्षकांचा खूप चांगला प्रतिसाद मिळाला होता. मर्दानी 2 या चित्रपटाची घोषणा झाल्यापासून या चित्रपटातील राणीचा लूक कसा असणार याची सगळ्यांना उत्सुकता लागली आहे. या चित्रपटात राणी पोलिस अधिक्षकाची भूमिका बजावणार आहे. या चित्रपटात राणीचा लूक कसा असणारा याचा एक्सक्लुझिव्ह फोटो आम्ही तुमच्या भेटीस आणला आहे. राणी चित्रपटात अतिशय बिनधास्त, कोणाला न घाबरणाऱ्या पोलिसाच्या भूमिकेत दिसणार आहे. 

दिग्दर्शक गोपी पुथरन मर्दानी 2 या चित्रपटाचे दिग्दर्शन करणार आहेत. गोपी यांनीच ‘मर्दानी’ची पटकथा लिहिली होती. राणीचा पती आदित्य चोप्रा या सीक्वलचा निर्माता असणार आहे. राणीने काहीच दिवसांपूर्वी या चित्रपटाच्या चित्रीकरणाला सुरुवात केली असून २०१९ च्या अखेरीस हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येणार असल्याचा अंदाज लावला जात आहे.

२०१४ साली राणीची प्रमुख भूमिका असलेला ‘मर्दानी ’ चित्रपट प्रदर्शित झाला होता. या चित्रपटात पोलिसाच्या भूमिकेत असलेली राणी सर्वांनाच खूप भावली होती.  बॉक्स ऑफिसवर हा चित्रपट सुपरहिट ठरलाच पण त्याचबरोबर राणीच्या अभिनयाचेही खूप कौतुक झाले होते. 

Web Title: Exclusive: Rani dons the cop uniform in Mardaani 2!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.