Even after giving a lot of hits, the actress remains in the house of a kitchen kitchen, a six-year-old writer is dating | ​अनेक हिट चित्रपट देऊनही ही अभिनेत्री राहते वन रूम किचनच्या घरात, सहा वर्षांनी मोठ्या असलेल्या लेखकाला करतेय डेट

स्वरा भास्करने गेल्या काहीच वर्षांत बॉलिवूडमध्ये तिचे एक वेगळे प्रस्थ निर्माण केले आहे. सुरुवातीच्या काळात स्वरा आपल्याला साहाय्यक अभिनेत्रीच्या भूमिकेत दिसली होती. नंतर तिने एक अभिनेत्री म्हणून तिची एक ओळख निर्माण केली. स्वराने तन्नू वेड्स मनू, तन्नू वेड्स मनू२, प्रेम रतन धन पायो, नील बट्टे सन्नाटे यांसारख्या चित्रपटांमध्ये खूप चांगल्या भूमिका साकरल्या आहेत. वीरे दे वेडिंग या चित्रपटामुळे तर सध्या तिच्या नावाची चांगलीच चर्चा आहे. या चित्रपटात तिच्यावर चित्रीत केलेला एक बोल्ड सीन चांगलाच वादात सापडला होता. पण हे दृश्य देऊन मी काहीच चुकीचे केले नाही असे स्वराचे स्पष्ट मत आहे.
स्वरा ही नेहमीच सोशल मीडियावर अॅक्टिव्ह असते आणि तिथे ती अनेकवेळा वादग्रस्त विधाने करत असते. स्वराचे वडील नेव्ही कमांडर होते. स्वराच्या घरातील कोणीही चित्रपटसृष्टीतील नसूनही तिने आज यश मिळवले आहे. आजवर अनेक हिट चित्रपट दिले असले तरी आजही ती वन रूम किचनच्या फ्लॅटमध्ये राहाते. ती अंधेरीतील वर्सोवा येथे एकटीच राहाते. ती गेल्या अनेक वर्षांपासून हिमांशु शर्माला डेट करतेय. हिमांशू हा प्रसिद्ध स्क्रीनप्ले रायटर आहे. त्या दोघांची भेट रांजना या चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यान झाली होती. या चित्रपटानंतर त्यांनी पुन्हा एकदा तनु वेड्स मनु रिटर्न या चित्रपटाच्या वेळी एकत्र काम केले आणि ते दोघे एकमेकांच्या प्रेमात पडले. स्वराने अनेक मुलाखतींमध्ये हिंमांशू सोबतच्या नात्याची कबुली दिली आहे. ते दोघे एकमकेांसोबत खूप खूश असल्याचे तिचे म्हणणे आहे. हिंमांशू हा स्वरापेक्षा सात वर्षांनी मोठा असून ते दोघे चार वर्षांपासून नात्यात आहेत. स्वरा आणि हिमांशू एकत्र राहाणार असल्याच्या बातम्या २०१६ मध्ये आल्या होत्या. स्वराचे आताचे घर लहान असल्यामुळे तिथे त्या दोघांना एकत्र राहाणे शक्य नसल्याने ते दोघे अंधेरीतील यारी रोड येथील मोठाल्या फ्लॅटमध्ये शिफ्ट होणार असल्याच्या चर्चा त्यावेळी रंगल्या होत्या. 

himanshu sharma

Also Read : BOX OFFICE : ‘या’ कारणामुळे ‘वीरे दी वेडिंग’च्या कमाईला लागणार ब्रेक; सहा दिवसांत कमाविले इतके कोटी?
Web Title: Even after giving a lot of hits, the actress remains in the house of a kitchen kitchen, a six-year-old writer is dating
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.