इमरान हाश्मीने घेतला कंगना, हृतिकचा धसका! अचानक बदलली ‘चीट इंडिया’ची रिलीज डेट!!

By ऑनलाइन लोकमत | Published: January 4, 2019 11:09 AM2019-01-04T11:09:29+5:302019-01-04T11:10:35+5:30

या नव्या वर्षांत बॉलिवूडच्या अनेक चित्रपटांचा बॉक्सआॅफिस संघर्ष अटळ मानला जात आहे. चालू महिन्याचेच सांगायचे तर या महिन्यात अनेक मोठ्या चित्रपटांची ‘बिग फाईट’ पाहायला मिळणार आहे.

emraan hashmi starrer cheat india will release on 18 january 2019 | इमरान हाश्मीने घेतला कंगना, हृतिकचा धसका! अचानक बदलली ‘चीट इंडिया’ची रिलीज डेट!!

इमरान हाश्मीने घेतला कंगना, हृतिकचा धसका! अचानक बदलली ‘चीट इंडिया’ची रिलीज डेट!!

googlenewsNext
ठळक मुद्देसौमिक सेन दिग्दर्शित ‘चीट इंडिया’ हा चित्रपट भारतीय शिक्षण व्यवस्थेवर भाष्य करणारा आहे. गतवर्षी रिलीज झालेल्या इमरान खानच्या ‘हिंदी मीडियम’ने देशाच्या शिक्षण व्यवस्थेवर अनेक प्रश्नचिन्ह निर्माण केले होते. आता इमरान हाश्मीही असेच काही करताना दिसणार आहे.

या नव्या वर्षांत बॉलिवूडच्या अनेक चित्रपटांचा बॉक्सआॅफिस संघर्ष अटळ मानला जात आहे. चालू महिन्याचेच सांगायचे तर या महिन्यात अनेक मोठ्या चित्रपटांची ‘बिग फाईट’ पाहायला मिळणार आहे. येत्या प्रजासत्ताक दिनाच्या मुहूर्तावर कंगना राणौतचा ‘मणिकर्णिका-द क्वीन आॅफ झांशी’ रिलीज होतोय. नेमक्या याचवेळी नवाजुद्दीन सिद्दीकीचा ‘ठाकरे’ आणि ऋतिक रोशनचा ‘सुपर 30’ बॉक्सआॅफिसवर धडकणार आहे. केवळ इतकेच नाही तर यादरम्यान इमरान हाश्मीचाचीट इंडिया’ हा चित्रपटही धडकणार होता. होता, यासाठी कारण आता इमरान हाश्मीच्याचीट इंडिया’ची रिलीज डेट बदलली आहे. होय, ‘मणिकर्णिका’ व ‘सुपर 30’शी संघर्ष टाळण्यासाठी ‘चीट इंडिया’च्या मेकर्सनी अचानक आपल्या चित्रपटाच्या रिलीजसाठी एक आठवडापूर्वीची तारीख निवडली. आता ‘चीट इंडिया’ २५ जानेवारीऐवजी येत्या १८ जानेवारीला रिलीज होऊ शकतो. अर्थात अद्याप याबद्दलची अधिकृत घोषणा झालेली नाही.


सौमिक सेन दिग्दर्शित ‘चीट इंडिया’ हा चित्रपट भारतीय शिक्षण व्यवस्थेवर भाष्य करणारा आहे. गतवर्षी रिलीज झालेल्या इमरान खानच्या ‘हिंदी मीडियम’ने देशाच्या शिक्षण व्यवस्थेवर अनेक प्रश्नचिन्ह निर्माण केले होते. आता इमरान हाश्मीही असेच काही करताना दिसणार आहे. इमरानने या चित्रपटात डोनेशन घेऊन मुलांचे अ‍ॅडमिशन करून देणा-या राकेश सिंह नावाचे पात्र साकारले आहे.

चित्रपटाची निर्मिती टी-सीरिज, अतुल कासबेकर व तनुज गर्गच्या एलिप्सिस एण्टरटेन्मेंट आणि इमरान हाश्मी करतो आहे. या चित्रपटात इमरान हाश्मीशिवाय श्रेया धनवंतरी मुख्य भूमिकेत दिसणार आहे.

Web Title: emraan hashmi starrer cheat india will release on 18 january 2019

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.