Ekta Kapoor gave this answer to those who demanded to stop 'Ya Hai Mohabbatein'. | ‘ये है मोहब्बतें’ बंद करण्याची मागणी करणा-यांना एकता कपूरने असे दिले उत्तर!!

निर्माता एकता कपूर हिच्यावर छोट्या पडद्याचे प्रेक्षक सध्या नाराज आहे. या नाराजीमागचे कारण आहे, ‘ये है मोहब्बतें’ ही छोट्या पडद्यावरची मालिका. २०१३ मध्ये सुरु झालेल्या या मालिकेला प्रेक्षकांचे प्रचंड प्रेम लाभले होते. त्यामुळेच आत्तापर्यत प्रत्येकवेळी या मालिकेने टीआरपी यादीत स्थान मिळवले होते़. अलीकडे या मालिकेत अनेक बदल केले गेलेत. साहजिकचं प्रेक्षकांना हे बदल आवडतील, हेतू हाच होता. पण प्रेक्षक मात्र मालिकेच्या कंटेन्टवर खूश होण्याऐवजी नाराज झाले आहेत. त्यामुळे चाहत्यांनी सोशल मीडियावर हॅशटॅग एंडवायएचएम वापरून ही मालिका बंद करण्याची मागणी केली आहे. पण कदाचित एकता कपूरला प्रेक्षकांच्या या नाराजीशी जराही देणे घेणे नाही. 


ही मालिका आई न बनू शकणा-या एका डॉक्टर महिला इशिताची कथा आहे. या कारणामुळे तिचे पहिले लग्न तुटते. यादरम्यान ती रूही नामक एका लहान मुलीच्या जवळ येते. आई सोडून गेलेल्या रूहीला इशिता प्रेम देते आणि पुढे या प्रेमाचे धागे इशिताला रूहीचे वडील रमनपर्यंत पोहोचतात. इशिता व रमन प्रेमात पडतात आणि पुढे दोघेही लग्न करतात. रमन इशितावर प्रचंड प्रेम करतो आणि तिला कुणी वांझोटी म्हटलेले त्याला आवडत नाही, असे आत्तापर्यंत या मालिकेत दाखवले गेले. पण आता अनेक वर्षांच्या अंतराने रमन पुरता बदललेला मालिकेत दाखवला जात आह़े. तो इशिताला वारंवार वांझोटी (बांझ) म्हणतो आणि या शब्दांशी जुळलेले अनेक संवाद म्हणतो. नेमके रमणचे हे संवाद प्रेक्षक पचवू शकलेले नाहीत. अनेक लोकांनी यावर टीका करत, ही मालिका बंद करण्याची मागणी केली आहे. पण एकताने ही मागणी प्रे करणा-या प्रेक्षकांना  सुनावले आहे.ALSO READ : ​एकता कपूरने या कारणामुळे अचानक बदलले मालिकेचे नाव

मी लोकांना सांगू इच्छिते की, एंडवायएचएम मोहिम चालवण्याऐवजी ही मालिका पाहणे बंद करा. सर्व कथा प्रेक्षकांच्या आवडीच्या हिशेबाने दाखवता येत नाहीत. मी माझ्या टीव्ही प्रेक्षकांवर प्रेम करते़ त्यांच्या विचारांचा आदर करते. पण आमचे रचनात्मक काम टीव्ही रेटींग आणि मापदंडांनी चालते. हा शो चाहत्यांसाठी आहे़ प्रेम आणि आदर नेहमीसाठी़...असे या मालिकेचा विरोध करणा-यांना एकताने बजावले आहे.
Web Title: Ekta Kapoor gave this answer to those who demanded to stop 'Ya Hai Mohabbatein'.
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.