In the eighth day of Sonam-Anand's marriage controversy, a community presented a wedding proposal on the wedding! | आठच दिवसात सोनम-आनंदचे लग्न वादाच्या भोवऱ्यात, एका समुदायाने लग्नातील रितीरिवाजावर उपस्थित केले प्रश्न!

अभिनेत्री सोनम कपूर आणि आनंद आहुजा यांच्या लग्नाला आठ दिवस होत नाहीत, तोच त्याला वादाची किनार लागताना दिसत आहे. गेल्या ८ मे रोजी अतिशय थाटामाटात आणि सिख रितीरिवाजानुसार या दोघांचे लग्न पार पडले. लग्नानंतर सोनम लगेचच कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्येही सहभागी झाली. त्या ठिकाणी तिने आपल्या ग्लॅमरस लूकने उपस्थितांची मने जिंकली. मात्र आता येत असलेल्या बातम्यांनुसार या दोघांच्या लग्नावर एक समुदायाने आक्षेप घेतला आहे. त्यांनी आरोप केला की, लग्नात सिख रितीरिवाजांचे उल्लंघन करण्यात आले आहे. 

मीड डेच्या रिपोर्टनुसार, शिरोमणी गुरुद्वारा प्रबंधक कमिटीच्या काही जुन्या सभासदांनी सोनम आणि आनंदच्या लग्नात विधी पार पाडताना समाजाच्या रितीरिवाजाचे योग्य पद्धतीने पालन केले गेले नसल्याचा आरोप केला आहे. हा आरोप तत्कालीन सभासदांनी आताच्या शिरोमणी गुरुद्वाºयाच्या प्रबंधकांवर केला आहे. या सभासदाच्या मते, लग्नाच्या वेळी आनंदच्या पगडीमधून तुरा काढण्यात आला नव्हता. असे करून त्यांनी सिख रितीरिवाजाच्या नियमांकडे एकप्रकारे दुर्लक्षच केले आहे. 

या सभासदांच्या मते, ‘सिख धर्मात लग्नाच्या वेळी नवरदेवाच्या पगडीमधील तुरा काढावा लागतो. मात्र सोनम आणि आनंदच्या लग्नावेळी या नियमाकडे दुर्लक्ष केले गेले. उपलब्ध माहितीनुसार, या सभासदांनी अकाल तख्तकडे याबाबतची रितसर तक्रारही केली आहे. तसेच या सभासदांनी हीदेखील मागणी केली आहे की, ज्या प्रबंधकांच्या उपस्थित सोनम आणि आनंदचे लग्न पार पडले, त्यांच्यावर कठोर कारवाई केली जावी. दरम्यान, गेल्या ८ मे रोजी सोनम आणि आनंदचे लग्न झाले. लग्नाच्या दिवशीच ग्रॅण्ड रिसेप्शनचेही आयोजन करण्यात आले होते. या ठिकाणी बॉलिवूडमधील अनेक सेलिब्रिटींनी उपस्थिती लावली होती. या फंक्शनचे बरेचसे फोटो आणि व्हिडीओ समोर आले असून, त्यास लोकांकडून मोठ्या प्रमाणात पसंती मिळत आहे. लग्नानंतर सोनम लगेचच कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये सहभागी झाली होती. या ठिकाणी तिने रेड कार्पेटवर एंट्री करून चाहत्यांना घायाळ केले होते. 

सोनमचा ‘वीरे दी वेडिंग’ हा चित्रपट १ जून रोजी प्रदर्शित होत आहे. या चित्रपटात सोनम व्यतिरिक्त करिना कपूर-खान, स्वरा भास्कर यांच्या प्रमुख भूमिका आहेत. ‘वीरे दी वेडिंग’ या चित्रपटाला शशांक घोष यांनी दिग्दर्शित केले आहे. दरम्यान, आनंद आणि सोनमच्या लग्नावरून निर्माण झालेला हा वाद आता पुढे काय वळण घेणार? हे बघणे औत्सुक्याचे ठरणार आहे. 
Web Title: In the eighth day of Sonam-Anand's marriage controversy, a community presented a wedding proposal on the wedding!
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.